News Flash

कंगनाच्या बहिणीने म्हटलं ‘सस्ती कॉपी’, तापसीने दिलं सडेतोड उत्तर

सध्या माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे मी लक्ष दिले पाहिजे - तापसी पन्नू

रंगोली चंडेल, तापसी पन्नू

कंगना आणि राजकुमार राव यांच्या ‘जजमेंटल है क्या?’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. तापसी पन्नू, वरुण धवन यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

तापसीने या ट्रेलचे कौतुक करत ‘हा खूपच कूल आहे, यांच्याकडून नेहमीच जास्त अपेक्षा होत्या आणि हा सिनेमा पैसा वसुल असेल.’ असे ट्विट केले. मात्र या ट्विटला कंगनाच्या बहिणीने उत्तर दिले आहे. रंगोलीने तापसीवर टीका करताना तिला कंगनाची ‘सस्ती कॉपी’ असे म्हटले आहे. ‘काही लोक कंगनाची कॉपी करून आपले दुकान चालवतात’ असं ती म्हणाली. मात्र, तापसीने कंगनाची ‘सस्ती कॉपी’ होणं टाळलं पाहिजे असा खोचक सल्ला रंगोलीने दिला.

या सगळ्या प्रकरणावर तापसीने अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “आयुष्य खूप लहान आहे. मी अशा गोष्टींवर माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. सध्या माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे मी लक्ष दिले पाहिजे. मला आनंदी गोष्टींमध्ये माझे लक्ष केंद्रित करायचे आहे.” कंगनाचे नाव ट्विटमध्ये न लिहिल्यामुळे रंगोलीने वरुणलाही प्रश्न विचारला होता.

रंगोलीने ही टीका केल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप तापसीच्या मदतीला धावला आहे. ‘हे जरा अति होते आहे आणि तू जे काही बोलते आहेस ते निराशा करणारे आहे.’ या आशयाचे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:46 pm

Web Title: tapsee pannu rangoli chandel sasti copy anurag kashyap djj 97
Next Stories
1 मुलीसाठी अक्षय कुमारने केला ‘हा’ चित्रपट
2 साहोमधील ‘सायको सैय्या’ गाण्यात प्रभास-श्रद्धाची भन्नाट केमिस्ट्री
3 पूजा हेगडेचा हा फोटो झाला व्हायरल
Just Now!
X