20 October 2020

News Flash

तारा सुतारिया- आदर जैन लवकरच बांधणार लग्नाची गाठ?

तारा खरंच करणार का लग्न?

तारा सुतारिया हे नाव आता चाहत्यांना आणि बॉलिवूडकरांना नवीन राहिलेलं नाही. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून ताराने कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटामुळे लोकप्रिय ठरलेली तारा अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत असते. त्यातच आता सोशल मीडियावर ताराच्या लग्नाची चर्चा जोर धरु लागली आहे. तारा लवकरच आदर जैनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तारा आणि आदर यांचीची चर्चा रंगली आहे. आदर आणि तारा बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत असून ते डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. मात्र, आता थेट त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, या प्रकरणी तारा आणि आदर या दोघांनीही भाष्य करणं टाळलं आहे.

आदर हा राज कपूर यांचा नातू असून करीना आणि करिश्माचा आत्येभाऊ आहे. आदरच्या भावाच्या म्हणजेच अरमानच्या लग्नात तारा उपस्थित होती. तेव्हापासून यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या लग्नात ताराने एक सुंदर गाणं सादर केलं. हे गाणं ऐकून आदरच्या आई खूश झाली आणि त्यांनी आनंदाने ताराला मिठी मारली होती.

दरम्यान, एकीकडे कपूर कुटुंबात रणबीर व आलियाच्या लग्नाची चर्चा रंगत असतानाच आता या कुटुंबातील आदरच्या लग्नाची चर्चादेखील होऊ लागली आहे. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ आणि ‘मरजावां’ या चित्रपटांत काम केलं आहे. तर आदर कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 4:41 pm

Web Title: tara sutaria aadar jain wedding soon reports kapoor family dcp98 ssj 93
Next Stories
1 ‘छलांग’ प्रेमाची कि स्पर्धेची; पाहा, राजकुमार रावच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर
2 “माझ्यासोबत फसवणूक झाली”; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
3 दिग्दर्शकाच्या ‘त्या’ वागणुकीनंतर बॉलिवूडकडे पाठ फिरवली; रुबीना दिलैकने सांगितला धक्कादायक अनुभव
Just Now!
X