News Flash

‘हिरोपंती २’मध्ये टायगरसोबत दिसणार तारा सुतारिया

‘हिरोपंती’ हा त्याचा चित्रपट २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता.

पहिल्याच चित्रपटातील अॅक्शन सीनमुळे चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. साबीर खान दिग्दर्शित ‘हिरोपंती’ हा त्याचा चित्रपट २०१४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात टायगरसोबत अभिनेत्री तारा सुतारीया मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.

निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या ‘हिरोपंती २’ चित्रपटात टायगर श्रॉफ सोबत तारा दिसणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साजिद नाडियाडवाल यांच्या चित्रपटातून अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच तारा सुतारिया देखील चित्रपटातील काही सीनमध्ये दिसणार आहे असे म्हटले जात आहे.

‘हिरोपंती 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत असून निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. हा चित्रपट १६ जुलै २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफने परिधान केलेले कपडे, त्याची उभं राहण्याची स्टाइल अगदी हॉलिवूड चित्रपट ‘जॉन विक’च्या पोस्टरमधील कियानू रिव्जप्रमाणे असल्याचे म्हटले जात होते. आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 7:56 pm

Web Title: tara sutaria to star opposite tiger shroff in heropanti 2 avb 95
Next Stories
1 म्हणून राहुल वैद्यने मागितली जान सानूची माफी
2 ‘बिग बॉस नाही पाहत म्हणून स्वत:ला…’, बबिताने व्यक्त केला संताप
3 “वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X