News Flash

‘तारक मेहता…’मधील ‘सुंदरलाल’ला झाला करोना

त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील दयाबेनचा भाऊ सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीला करोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

काही दिवसांपूर्वी मयूर मालिकेच्या चित्रीकरणासाठी अहमदाबादहून मुंबईला आला होता. चित्रीकरण पूर्ण करताच तो पुन्हा अहमदाबादला रवाना झाला. तेथे पोहोचल्यावर त्याला ताप आला होता. त्याने तातडीने करोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. त्यानंतर मयूरला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची परिस्थिती स्थिर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemali Mayur vakani (@hemali_vakani)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत मयूर सुंदरलाल म्हणजेच दया बेनच्या भावाची भूमिका साकारत आहे. मालिकेतील मयूर आणि दिशाची भाऊ-बहिणीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मयूर आणि मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणी दिशा वकानी हे खऱ्या आयुष्यातही बहिण-भाऊ आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून दिशाने मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:28 pm

Web Title: tarak mehata ka oolta chasmha sundarlal aka mayur vakani corona positive avb 95
Next Stories
1 ‘गलीबॉय’लाही करोनाची लागण
2 Birthday Special: स्वत: रिक्षावर पोस्टर चिटकवून आमिरने केले होते पहिल्या चित्रपटाचे प्रमोशन
3 आ रही है पुलिस! या दिवशी अक्षयचा ‘सूर्यवंशी’ होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित
Just Now!
X