News Flash

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बापूजींचं हे रुप पाहिलंत का?; पत्नी आहे खूपच ग्लॅमरस

बापूजी म्हणून आजोबांची भूमिका साकारणाऱे चंपकलाल म्हणजेच अभिनेता अमित भट्ट खऱ्या आयुष्यात बरेच तरुण आहेत.

(Photo-instagram@amitbhattmkoc)

टेलिव्हजनवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या शो मधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. जेठालालच्याच कुटुंबाचं म्हणायंच झालं तर दयाबेन आणि जेठालालसोबतच टप्पू आणि बापूजी देखील प्रेक्षकांमध्ये चांगलेच हीट आहेत. जेठालाल आणि बापूजी म्हणजेच चंपकलाल यांची तू तू मै मै पाहणं लोकांना आवडतं. या मालिकेत चंपकलालाली भूमिका साकारणारे अभिनेता अमित भट्ट जेठालालच्या वडिलांची भूमिका बजावत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचं वय जेठालालहून कमी आहे.

खरं तर प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायची कायमच इच्छा असते. तर आज आम्ही तुम्हाला चंकपलाला म्हणजेच अमित भटट् यांच्या बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहेत. बापूजी म्हणून आजोबांची भूमिका साकारणाऱे चंपकलाल म्हणजेच अभिनेता अमित भट्ट खऱ्या आयुष्यात बरेच तरुण आहेत. शिवाय त्यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

हे देखील वाचा: संपत्तीच्या वादातून आईचं अपहरण केल्याचा अभिनेत्रीचा आरोप; पंतप्रधानांकडे मागितली मदत

बापूजी म्हणजे अभिनेता अमित भट्ट यांच्या आयुष्यातील त्याच्या पत्नीचं नाव कृती भट्ट असं आहे. अमित अनेकदा आपल्या पत्नीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांकडूनही अमित यांच्या फोटोला मोठी पसंती मिळताना दिसते. अमित यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या पत्नीतचे अनेक फोटो आहेत. यात त्यांची पत्नी सुंदर असण्यासोबतच ग्लॅमरस असल्याचं पाहायला मिळतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

हे देखील वाचा: “सकाळची लाळ त्वचेसाठी गुणकारी”; अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या चाहत्यांना टिप्स

अमित आणि कृती यांना दोन मुलं आहेत. त्यांची दोन्ही मुलं क्यूट असनू त्यांच्या एका मुलाने तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये अभिनय देखील केलाय. काही एपिसोडमध्ये तो टप्पूचा मित्र म्हणून झळकला होता. अमित भट्ट यांच्या दोन्ही मुलांची नावं देव आणि दीप अशी आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोच्या सुरुवातीपासून अमित भट्ट या शोसोबत जोडले गेले आहेत. जेठालाल आणि बापूजीमध्ये कायम रंगणारा वाद त्यांच्यां भांडणांमुळे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंज होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 9:54 am

Web Title: tarak mehata ka oolta chshmah bapuji aka amit bhatt real life wife is glamours and hot then babitaji kpw 89
Next Stories
1 ‘ब्लॅक’ चित्रपटात बिग बींसोबत दिसलेली ही लहान मुलगी आता दिसते खूपच सुंदर; पाहून थक्क व्हाल
2 कंगना रनौतला ‘दीदी’ म्हणाला केआरके, ट्रोल झाल्यानंतर दिलं ‘हे’ उत्तर
3 कियारा अडवाणीला साकारायची आहे मधुबालाची भूमिका !
Just Now!
X