News Flash

“दिशा आली तर ठिक नाही तर ..”, दयाबेनच्या वापसीवर असित मोदीं म्हणाले..

"शो मस्ट गो ऑन"

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, चंपकलाला, तारक मेहता ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. त्यामुळे मालिकेच दया बेन कधी परणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच लवकरच दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत परतणार असे संकेत मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दिले होते.

ती नशीबवान आहे.

अनेक चाहते या मालिकेच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना सोशल मीडियावर दिशाच्या वापसीबद्दल प्रश्न विचारत आहेत. अशात या शोचे निर्माते असित मोदी यांनी चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ” दिशा बऱ्याच काळापासून या मालिकेशी जोडली गेलीय. आई झाल्यामुळे तिला काही विशेष सूट देण्यात आली होती. ती आणखी थोडा वेळ घेऊन शेमध्ये परत येऊ शकते.” याआधी देखील तिला गरोदरपणासाठी सुट्टी देण्यात आली होती. पुढे ते म्हणाले, “खूप कमी लोक असे असतात ज्यांना चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळतं. दिशाला तिच्या भूमिकेमुळे चाहत्यांचं प्रेम मिळालं. ती नशीबवान आहे. आशा आहे ती लवकच शोसाठी परत येईल. जर कौटुंबिक कारणांमुळे तिला हे शक्य होत नसेल तर तिच्या निर्णयचा आम्ही आदर करतो. ”

आणखी वाचा- ‘तारक मेहता…’मधील मराठमोळ्या अभिनेत्याने मुलाच्या उपचारासाठी मागितली मदत

 दिशा आली तर ठिक नाही तर…
पुढे असित मोदी म्हणाले, ” दिशा येवो किंवा न यवो मात्र मालिकेत दया बेन मात्र नक्की परतणार दिशा आली तर ठिक नाही तर शोसाठी दुसऱ्या दया बेनचा शोध घेतला जाईल. काही झालं तरी शो मस्ट गो ऑन.” असं ते म्हणाले. त्यामुळे आता मालिकेत दिशा वकानी परतली नाही तर तिची जागा एखादी दुसरी अभिनेत्री घेऊ शकते.

आणखी वाचा- “तारक मेहता….”च्या ४ कलाकारांना करोनाची लागण, चित्रीकरण थांबवण्यावर निर्माते म्हणाले,”…….”

दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ४ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:51 pm

Web Title: tarak mehata ka ulta chashma asit modi on disha vakani come back said if she comes that will be good or show muat go on kpw 89
Next Stories
1 “त्या दोघांनी मला आणि श्रीदेवीला एका खोलीत बंद केलं..तरीही आम्ही एकमेकींशी बोललो नाही”- जया प्रदा
2 “फोटो कोणी काढला रे?”, चित्र काढणाऱ्या अर्जुनला चाहत्यांचा सवाल
3 दिल थोड़ा सहम तो जाता है…; करोनाच्या वेदना अभिनेता सिद्धांतने कवितेतून केल्या व्यक्त
Just Now!
X