News Flash

टप्पूवर जेठालाल नाराज, खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी आणि राज अनदकतमध्ये वाद?

दिलीप जोशींनी राजला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र चाहत्यांशी जोडलं गेलंय. या शोमध्ये जेठालाल ही मुख्य भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारत असून जेठालालच्या मुलाची म्हणजेच टप्पूची भूमिका अभिनेता राज अनदकत साकारात आहे.

शोमधील जेठालाल आणि टप्पू या बाप-लेकाच्या जोडीला चाहत्यांची मोठी पंसती मिळतेय. मात्र प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यांत दोघांचं नातं फारसं चांगलं नसल्याच्या चर्चा नुकत्याच रंगू लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून दिलीप जोशी आणि राज यांच्यात वाद निर्माण झाल्याच्याही चर्चा आहेत. अभिनेते दिलीप जोशी टप्पूवर नाराज असल्याचं कळतंय. असं असलं तरी नुकत्याच स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशींनी या सर्व अफवा असल्याचं म्हंटलं आहे.

काय आहे नाराजीचं कारण
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये दिलीप जोशी सिनियर अभिनेते आहेत. असं असून ते नेहमी शूटिंगसाठी वेळेत सेटवर हजेरी लावतात. तर टप्पू म्हणजेच राज अनदकत अनेकवेळा शूटिंगसाठी उशीरा पोहचतो. यासाठी राजला अनेकदा सूचना देखील देण्यात आली आहे. नुकतीच दिलीप जोशींना राजमुळे एक तास वाट पाहावी लागली होती. त्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. कायम उशीरा येत असल्याने दिलीप जोशींनी राजला सुनावल्याचंही बोललं जातं आहे. एवढचं नाही तर राजच्या या वागणुकीवर नाराज होवून दिलीप जोशींनी त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. तर राज मात्र त्यांना अजूनही फॉलो करत आहे.

आणखी वाचा: लॉकडाउनमुळे शिल्पा शिंदेची झाली ‘अशी’ अवस्था, अभिनय सोडून बांधकाम क्षेत्रात करतेय काम

 

View this post on Instagram

 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोच्या सेटवर कलाकारांमध्ये वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी देखील शैलेश लोढा आणि दिलीप जोशी यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 6:05 pm

Web Title: tarak mehata ka ulta chshma actor dilip joshi angry on raj anadkat for his behavior kpw 89
Next Stories
1 बिहारचं राजकारण आणि राबडी देवीच्या कहाणीवर आहे का हुमा कुरेशीची ‘महारानी’ सीरिज ?
2 सोनू सूदच्या नावाने चाहत्याने सुरू केलं मटण शॉप, “मी शाकाहारी आहे” अभिनेत्याची भन्नाट प्रतिक्रिया
3 लॉकडाउनमुळे शिल्पा शिंदेची झाली ‘अशी’ अवस्था, अभिनय सोडून बांधकाम क्षेत्रात करतेय काम
Just Now!
X