31 October 2020

News Flash

Photo : ‘तारक मेहता…’मधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई!

या फोटोंमध्ये तिचं बेबीबंप दिसत आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने अनेकांना प्रकाशझोतात आणलं. त्यामुळे आज या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या ओळखीचा झालेला आहे. या मालिकेतील रिटा रिपोर्टर अर्थात अभिनेत्री प्रिया अहुजा राजदा लवकरच आई होणार आहे. प्रिया गरोदर असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आई होणार असल्याची माहिती दिली.

प्रिया पहिल्यांदाच आई होणार असल्यामुळे ती आणि तिचे कुटुंबीय प्रचंड आनंदात आहेत. हाच आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. प्रियाने कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक फोटो शेअर करत ही आनंदाची माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

Ten little fingers, ten little toes.. With love and grace, our family grows.. Cudnt be a better day than today to announce this…Happy Janmashtami

A post shared by Pri (@priyaahujarajda) on

प्रिया सध्या मालदीवमध्ये तिच्या पतीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियाचं बेबीबंप दिसत आहे.

दरम्यान, प्रियाने गुजराती दिग्दर्शक मालव राजदा याच्यासोबत लग्न केलं आहे. मालव राजदा हे ‘तारक मेहता उल्टा चष्मा’चे चीफ डायरेक्टर आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर प्रिया आणि मालवची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 11:07 am

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah actress priya ahuja aka rita pregnant ssj 93
Next Stories
1 TOP 10 : ‘कबीर सिंग’पासून ‘मणिकर्णिका’पर्यंत ‘हे’ आहेत या वर्षातील हिट चित्रपट
2 संपत्तीविषयी बिग बींनी घेतला महत्वाचा निर्णय, करणार ‘या’ व्यक्तींच्या नावावर
3 ‘या’ कारणामुळे सारा-कार्तिक हॉस्पिटलमध्ये!
Just Now!
X