News Flash

‘बिग बॉस नाही पाहत म्हणून स्वत:ला…’, बबिताने व्यक्त केला संताप

तिचे हे ट्विट चर्चेत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. मालिकेती प्रत्येक पात्रही चर्चेत असतं. खासकरुन जेठालाल आणि बबिता यांच्यामधील संवाद हे चर्चेचा विषय असतो. मालिकेत बबिता हे पात्र मुनमुन दत्ताने साकारले आहे. मुनमुनही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच बिग बॉसवर टीका करण्यांना सुनावले आहे.

सध्या बिग बॉस पर्व १४ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण अनेकजण सोशल मीडियावर शोवर टीका करताना दिसतात. टीका करणाऱ्या लोकांवर संतापून मुनमुनने सुनावले आहे. तिने केलेल ट्विट सध्या चर्चेत आहे.

‘जे लोकं बिग बॉस पाहात नाहीत ते बिग बॉस विषयी त्यांची मते कशी बनवू शकतात? तुम्हाला असे का वाटते की जे पाहतात त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगले आहात. तुम्हाला बिग बॉस पाहायला आवडत नाही हा तुमचा निर्णय आहे. मी आणि इतर लोकं जे पाहातात ते त्यांची आवड आहे त्यांचा निर्णय आहे. तुम्ही बिग बॉस नाही पाहत म्हणून स्वत:ला महान समजू नका’ या आशयाचे ट्विट मुनमुनने केले आहे. सध्या तिचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 5:29 pm

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah babita aka munmun dutta slam people avb 95
Next Stories
1 “वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा
2 अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलताच मुकेश खन्ना यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?
Just Now!
X