News Flash

‘तारक मेहता’ मधील दयाबेन लग्नाच्या बेडीत!

दिशा २००८ पासून सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत काम करत आहे.

मुंबईस्थित चार्टड अकाऊंटट मयूर परीहा यांच्याशी तिचा विवाह झाला.

टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील ‘दयाबेन’ ही लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारी दिशा वाकानी मंगळवारी विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईस्थित चार्टड अकाऊंटट मयूर परीहा यांच्याशी तिचा विवाह झाला. दिशाचा लग्नसोहळा अत्यंत खासगी स्वरूपाचा असणार याची चर्चा सुरूवातीपासूनच होती. सूत्रांच्या माहितीनुसार ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या संपूर्ण टीम दिशाच्या लग्नाला उपस्थित होती.

दिशा २००८ पासून सब टीव्हीच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून दिशाला लोकप्रियता मिळाली. शिवाय ‘खिचडी’ (२००४) आणि ‘इंस्टेंट खिचडी’ (२००५) या मालिकांमधून ती छोट्या पडद्यावर दिसली आहे. दिशाने आतापर्यंत १० पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स जिंकले आहेत. याशिवाय, बॉलिवूडच्या ‘कमसिन : द अनटच्ड’ (१९९७), ‘फूल और आग’ (१९९९), ‘देवदास’ (२००२), ‘मंगल पांडे : द राइजिंग’ (२००५), ‘सी कंपनी’ (२००८) आणि ‘जोधा अकबर’ (२००८) या चित्रपटांमध्येही तिने काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2015 1:21 am

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah dayaben aka disha vakani ties the knot
Next Stories
1 CELEBRITY BLOG : तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं…
2 अमोल पालेकर @ ७१, योगोयोगाने झाले अभिनेता
3 गालीबनंतर मीच- रणबीर
Just Now!
X