News Flash

‘तारक मेहता का उलटा चष्मा’फेम नट्टू काका रुग्णालयात दाखल

अभिनेता घनश्याम नायक यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

‘तारक मेहता का उलटा चष्मा’फेम नट्टू काका रुग्णालयात दाखल

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील नट्टू काका यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नट्टू काका ही भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांना घशाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटलं आहे.

घनश्याम नायक यांना अचानकपणे घशाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

घनश्याम नायक यांच्या रिपोर्टमधून त्यांच्या घशात गाठ झाल्याचं समोर आलं आहे. या गाठीमुळे त्यांना त्रास होत असून अचानक त्यांची प्रकृती बिघडली.त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच ते लवकर बरे व्हावेत यासाठी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या सगळ्या कलाकारांनी प्रार्थना केल्याचं म्हटलं आहे. तसंच मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसनेदेखील त्यांना मदत केल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घनश्याम नायक हे गेल्या १० वर्षांपासून ‘तारक मेहता..’या मालिकेचा भाग आहेत. या मालिकेतून ते घराघरात पोहचले असून त्यांनी साकारलेली नट्टू काका ही भूमिका अनेकांना भावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 12:01 pm

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah nattu kaka actor ghanshyam nayak admit in hospital ssj 93
Next Stories
1 यंदा ‘केबीसी’मध्ये होणार मोठा बदल; ऑडियन्स पोल होणार नाहीसा?
2 नुकसान मालिका कधी संपणार?
3 व्यथा एकपडदा चित्रपटगृहांची 
Just Now!
X