छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या बारा वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. गोकुळधाम सोसायटीमधील प्रत्येक कलाकार चर्चेत असतो. या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. चला जाणून घेऊया या मालिकेतील कलाकार खऱ्याखुऱ्या आयुष्यात किती श्रीमंत आहेत आणि ते मालिकेच्या एका भागासाठी किती मानधन घेतात…

मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे जवळपास ३७ कोटींची संपत्ती असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच मालिकेतील एका भागासाठी ते १.५ लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

अभिनेत्री मुनमुन दत्ता मालिकेमध्ये बबीताची भूमिका साकारत आहे. तिच्या आणि जेठालालमध्ये होत असलेले संवाद प्रेक्षकांना विशेष आवडतात. असे म्हटले जाते की मुनमुन एका भागासाठी ५० हजार रुपये मानधन घेते. तिच्याकडे एकूण ७ कोटींची प्रॉपर्टी असल्याचे म्हटेले जाते.

तारम मेहता मधील शैलेश लोढा एका भागासाठी जवळपास १ लाख रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच त्यांच्याकडे एकूण ७ कोटींची प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी सतत चर्चेत असते. ती मालिकेतील इतर कलाकरांपेक्षा जास्त मानधन घेत असल्याचे म्हटले जाते. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार तिच्याकडे जवळपास ३७ कोटींची प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका १८ जुलै २००८ रोजी सुरु झाली होती. आता या मालिकेचे २८०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. मालिकेतील दया बेन, जेठालाल, बबिता, भीडे, डॉक्टर हाती ही पात्र प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचे दिसत आहे.