20 January 2020

News Flash

धक्कादायक! अभिनेत्याच्या मुलाने केली आईची हत्या

मुलाच्या डोक्यात होते संशयाचे भूत

टार्झन या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेले हॉलिवूड अभिनेते रॉन अ‍ॅली यांचा मुलगा कॅमरुन अ‍ॅलीने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूने आईची हत्या केल्यानंतर कॅमरुन फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. त्याचा पत्ता कळाल्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते. पण, यावेळी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यु झाला.

(रॉन अ‍ॅली आणि वॅलेरी अ‍ॅली)

कॅमरुनला ६२ वर्षीय आई वॅलेरी लुंडिन अ‍ॅली हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरुन त्याचे अनेकदा आईबरोबर कडाक्याचे भांडण देखील झाले होते. एक दिवस दोघांमधील वाद टोकाला गेला. वादातच राग अनावर झालेल्या कॅमरूननं आपल्या आईची हत्या केली.

रॉन अ‍ॅली आणि कॅमरुन अ‍ॅली

हा प्रसंग घडला तेव्हा ८१ वर्षीय रॉन अ‍ॅली घरात उपस्थित होते. त्यांनी आपल्या पत्नीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्नी आणि मुलाच्या झटापटीत ते जबर जखमी झाले. तर आईची हत्या केल्यानंतर कॅमरुन घरातून पळून गेला. पोलिसांनी त्याला फरार आरोपी म्हणून घोषित केले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथकही नेमले होते. दरम्यान, कॅमरूनचा ठिकाणा माहिती झाल्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते. पोलीस आल्याचे कळाल्यानंतर कॅमरून गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. यात गोळी लागून कॅमरून जागीच ठार झाला.

First Published on October 18, 2019 2:49 pm

Web Title: tarzan stars wife stabbed to death by their son mppg 94
Next Stories
1 Video: श्रेयाच्या आवडीनिवडी ओळखण्याच्या या खेळामध्ये भाऊ पास की नापास?
2 हातात वाईन ग्लास घेतलेल्या मंदिराला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
3 Photo : …म्हणून होतेय श्रेया बुगडेच्या ‘या’ टॅटूची चर्चा
Just Now!
X