अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसाव्दारे हत्या करण्यात आली. या व्यक्तीचं नाव जॉर्ज फ्लॉइड असं होतं. हे प्रकरण पोलिसांव्दारे दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन हॉलिवूड पॉप सिंगर टेलर स्विफ्टने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही तुम्हाला नेव्हेंबरमध्ये मतदान करणार नाही.” अशी धमकीच तिने दिली आहे.

“देशाला तुम्ही श्वेत वर्चस्व आणि वर्णव्देशाच्या आगीत ढकललं आहे. हिंसात्मक धमक्या दिल्यानंतर आता तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारत आहात? देशात सध्या गोंधळ माजला आहे. आम्ही तुम्हाला नोव्हेंबरमध्ये मतदान करणार नाही.” अशा आशयाचे ट्विट टेलर स्विफ्टने केलं आहे.

टेलर स्विफ्ट पाश्चात्य संगीत क्षेत्रातील एक लोकप्रिय गायीका आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत २० लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणावर यापूर्वी रिहाना, प्रियांका चोप्रा, निक जोहानस, किली रोहँड यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता.