बॉलिवूड चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्या ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत आहे. ट्रेलरला प्रदर्शनाच्या २४ तासांमध्ये सर्वाधिक डिसलाइक मिळाले आहेत. तसेच सोशल मीडियावर चित्रपटावर टीका करण्यात येत आहे. आता अभिनेत्री कंगना रणौतने ट्रेलर पाहून आलिया भट्ट आणि रणबीरवर निशाणा साधला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट आणि रणबीरपेक्षा चांगले कलाकार शोधून दाखवा असे म्हणणाऱ्या आर बाल्की यांना देखील सुनावले आहे.

नुकताच कंगनाने एका यूजरला रिप्लाय दिला आहे. ‘कोणी तरी लपून बसलेल्या आर बाल्की यांना शोधा. रणबीर आणि आलियापेक्षा कोणते चांगले कलाकार नाहीत असे त्यांनी म्हटले होते. रणबीर आणि आलिया हे दोघेही सामान्य दर्जाचे कलाकार असूनही माफिया मीडियाने त्यांना मोठे केले आहे. त्यांचे मित्र आणि पुरस्कार देखील फेक आहेत. आता तुमची वेळ संपली आहे या आशयाचा उत्तर तिने दिले आहे.

कंगनाने उत्तर दिलेल्या यूजरच्या ट्विटमध्ये आलियाच्या ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत ‘सडक २’मधील डायलॉग कोणी लिहिले आहेत असे म्हटले आहे.

आर बाल्की यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, ‘स्टार किड्सला खरच मोठा फायदा असतो का? असा प्रश्न आहे. तर मी सांगेन हो. जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत. मला तुम्हा सर्वांना एक साधा सरळ प्रश्न विचारायचा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या पेक्षा चांगले कलाकार मला शोधून दाखवला आणि मग आपण यावर बोलू. असे बोलून आपण त्यांच्यासारख्या अतिशय चांगल्या कलाकारांवर अन्याय करत आहेत’ असे म्हटले होते. त्यामुळे आता कंगनाने आता आर बाल्की यांच्यावर निशाणा साधला आहे.