छोट्या पडद्यावरील वादग्रस्त हिंदी रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमधून प्रकाशझोतात आलेला आकाश ददलानीच्या नव्या म्युझिक व्हिडिओचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. आकाशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या व्हिडिओचा टीझर शेअर केला असून ‘बँग बँग’ हा व्हिडिओ चार जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बँग बँग’चा टीझर इन्स्टावर पोस्ट करताना आकाशने एक साजेशी कॅप्शनही त्याला दिली आहे. ‘आज माझी सारी स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहेत. मात्र कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. हा कालावधी फार मोठा असून त्यासाठी तुम्हाला संयम बाळगायला हवा’ असं आकाशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बिग बॉस हिंदीमधून आजवर अनेक कलाकार नावारुपाला आले असून त्यांच्या नावाची सतत चर्चा पाहायला मिळते. त्यांच्या या चर्चांशिवाय आज कलाविश्वात लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांच्या नाराजीच्या चर्चाही रंगल्या आहेत. तर मग चला जाणून घेऊ या मंगेशकर यांच्या नाराजीचं कारणं आणि बी- टाऊनमधील इतर चर्चांविषयी…
..म्हणून करण जोहरवर मंगेशकर कुटुंबिय झाले नाराज!
कधीकाळी ‘हा’ स्टारकिड होता तैमूरपेक्षाही अधिक लोकप्रिय!
अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ला मीरा राजपूत काय म्हणाली ऐकलंत का?
आजारपणाला कंटाळलेल्या इरफानला शाहरुख करतोय अशी मदत
Social Viral : वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी मुंबई पोलिसांची ‘धडक’ मोहिम
..आणि ‘फन्ने खान’ मधील गाण्यात झाला असा बदल!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
‘या’ कारणामुळे सलमानने मानले चाहत्यांचे आभार!
पैसा महत्त्वाचा नाही, नुसरत भरूचानं नाकारली १ कोटींची ऑफर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 23, 2018 6:06 pm