लवकरच ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं १२वं पर्व येत आहे. या पर्वात ‘विचित्र जोडी’ ही संकल्पना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या १२ व्या सिझनची सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे. याचा दुसरा टीझरही नुकताच लाँच करण्यात आला आहे.

पहिल्या टीझरमध्ये ‘गुरुजीं’च्या भूमिकेत दिसलेला सलमान नव्या प्रमोमध्ये ‘ बजरंगी भाईजान’च्या भूमिकेत आहे. ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात सासू-सून, मामा-भाचा, साहेब-नोकर अशा जोड्या पाहायला मिळणार आहेत. या जोड्या कोणत्या हे जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना आहे.

यासाठी अंकिता आणि मिलिंद सोमण हे नाव देखील चर्चेत आहे. मात्र अद्यापही दोघांनी ‘बिग बॉस’ १२ साठी होकार कळवला नाही. ब्रिटीश पॉर्न स्टार डॅनी डी याचंही नाव नव्या पर्वासाठी चर्चेत आहे. माजी ‘मिस टीन नॉर्थइस्ट इंडिया’ महिका शर्माहिच्यासोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याची तयारी त्यानं दर्शवली आहे. काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांचीही नावं यासाठी चर्चेत आहेत.