News Flash

तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांच्या ‘हसीन दिलरुबा’चा टीझर रिलीज; 2 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर होणार स्ट्रीम

एका खळबळजनक कॅप्शनसह रिलीज केला टीझर. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर होतोय व्हायरल.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटासाठी खूपच चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नुकताच या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झालाय. सध्या इंटरनेटवर या टीझरने धुमाकूळ घातलाय. या टीझरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू ही बोल्ड सीनमध्ये दिसून आली. एक खळबळजनक टॅगलाईनसह हा टीझर शेअर केला आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी अनेक चित्रपटांमुळे बरीच चर्चेत आली आहे. ‘रश्मि रॉकेट’, ‘लूट लपेटा’ नंतर आता तिचा आगामी चित्रपट ‘हसीन दिलरुबा’बाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. या चित्रपटाचा पोस्टर अभिनेत्री तापसी पन्नूने याआधीच शेअर केला होता. या पोस्टरमधून तिने चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली होती. त्यानंतर अभिनेत्री तापसीने ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज केलाय.

अभिनेत्री तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा टीझर रिलीज केला. हा टीझर शेअर करताना तिने एक खळबळजनक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलं, “‘प्यार के तीन रंग, खून के छींटों के संग” या टीझरमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी याच्यासोबत तिचे खूपच बोल्ड सीन दिसून आले. यात सर्वांना आश्वर्य करून सोडणाऱ्या एका कटकारस्थाचा अंदाज देखील देण्यात आलाय. यात अभिनेता हर्षवर्धन राणे याची खूपच इंटरेस्टिंग भूमिका असणार, याची कल्पना हा टीझर पाहून येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

हा टीझर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ही एक मिस्ट्री थ्रिलर फिल्म आहे. येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सर स्ट्रीम करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केलं आहे. आनंद एल राय आणि हिमांशु शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्साहित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 10:38 pm

Web Title: teaser of taapsee pannu vikrant massey starrer haseen dillruba oozes lust obsession deceit prp 93
Next Stories
1 अपडेट: अर्जुन कपूरची बहिण अंशुलाला रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 आई कुठे काय करते : अनिरुद्ध घेणार अरुंधतीसोबत घटस्फोट?
3 ‘सुशांत प्रमाणे तुझाही मृत्यु होऊ शकतो’, सोशल मीडिया पोस्टवरून मोहितची पोलिसात तक्रार
Just Now!
X