News Flash

संजूबाबाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटामध्ये संजूबाबा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता संजय दत्त

बॉलिवूडमधील संजूबाबाच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरुन या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. या चित्रपटाची कथा वडिल-आणि मुलगी यांच्यातील भावनात्मक दर्शन घडविणारी अशी आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक दर्जेदार असून वेगळ्या आणि यातील भूमिकेमुळे मी या चित्रपटामध्ये काम करण्याचे ठरविले, असे संजय दत्तने म्हटले आहे.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संजय दत्त चित्रपट निवडताना काळजी घेताना दिसत आहे. यामध्ये तो विनोद चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद यांच्या चित्रटात देखील काम करताना दिसणार आहे. तसेच संजय दत्त मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या निर्मितीमध्येही सहभागी होताना दिसत आहे. ‘भूमी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी यापूर्वी प्रियांका चोप्रा सोबत ‘मेरीकोम’ आणि ऐश्वर्या रायसोबत ‘सरबजीत’ चित्रपट केला होता. या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आगामी चित्रपटातून संजूबाबालाही अपेक्षा असतील.  मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगावासाची शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तचा या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल.  ओमंग कुमार दिग्दर्शित करत असणाऱ्या चित्रपटाची टी-सीरीजचे भुषण कुमार आणि संदीप सिंग निर्मिती करणार आहेत.

तुरुंगावासाची शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तच्या जीवनावर राजू हिरानींनी चित्रपटाला सुरुवात केली आहे. राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अभिनेता संजय दत्त नेहमीच चर्चेचा विषय बनत आला आहे. मग ते अमली पदार्थांचा विषय असो, अती मद्यपानाचा विषय असो. ९० च्या दशकांतील त्याच्या खलनायक चित्रपटाने चित्रपट चाहत्यांमध्ये एक वेगळीच भूरळ घातली होती. फेब्रुवारीमध्ये संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तो मोठ्या पडद्यावर येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 5:20 pm

Web Title: teaser poster sanjay dutt starrer bhoomi release august 2017
Next Stories
1 आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणावे की पॅशनेट?
2 दंगलमुळे आमिर खानची उडाली झोप, केवळ एक तासाचाच मिळतो वेळ
3 मुव्ही रिव्ह्यूः रणवीरमय ‘बेफिक्रे’
Just Now!
X