27 September 2020

News Flash

Video : अन्यायाविरुद्ध तेजश्रीचा ‘एल्गार’

हा चित्रपट "ऋण" कादंबरीवर आधारित आहे

तेजश्री प्रधान

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असलेल्या ‘जजमेंट’ या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता या चित्रपटामधलं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातून तेजश्री आणि तिने पुकारलेल्या बंडावर भाष्य करण्यात आलं आहे.

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ हा चित्रपट येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील ‘एल्गार’ हे गाणं नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. गाण्याच्या सुरुवातीलाच एक आई तिच्या पंखांखाली वाढणाऱ्या मुलींना उंच आभाळात उडण्याचे स्वप्न दाखवते. कालांतराने तेजश्री आणि तिच्या आईच्या आयुष्यात घडणाऱ्या एका घटनेमुळे आईला न्याय मिळवून देण्यासाठी तेजश्री तिच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. यात ती अनेक चढ-उतार पार करत आहे. आईला न्याय मिळवून देण्याचा दृढ निश्चय करून आपल्या चालाख वडिलांविरुद्ध तेजश्री ‘एल्गार’ पुकारते.


जावेद अली यांच्या जादुई आवाजात असलेले ‘एल्गार’ हे गाणं एका मुलीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणारे आहे. या गाण्याला नवल शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे.

या चित्रपटामध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान यांच्या मुख्य भूमिका आहे. सोबतच ‘श्री पार्टनर’ फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये ,महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत.

हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या “ऋण” कादंबरीवर आधारित आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे असून सह निर्मात्याची धुरा हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 12:02 pm

Web Title: tejashri pradhan new marathi movie song elgaar out
Next Stories
1 आमिरच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, साकारणार ‘ही’ भूमिका
2 फॅनी वादळग्रस्तांना अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात
3 टोनी स्टार्कच्या ‘आय लव्ह यू ३०००’चा अर्थ काय?
Just Now!
X