बिहार विधानसभा निवडणुकीतील दोन टप्प्यातील मतदान झालं आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या सात नोव्हेंबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता केवळ दोनचं दिवस उरले आहेत. मात्र राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप थांबलेल्या नाहीत. नुकतेच महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून जनेताचा किती पाठिंबा त्यांना आहे? हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांच्या या व्हिडीओवर बॉलिवूड दिग्दर्शक मनोज यादव यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – होऊ दे खर्च! १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने घातला ३७ कोटींचा ड्रेस

अवश्य पाहा – करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

“बेरोजगारी आणि नोकऱ्यांच्या संधी अभावी बिहारमधील तरुण वर्ग आर्थिक कचाट्यात सापडला आहे. या तरुण वर्गाला नोकऱ्यांच्या संधी द्या, तरच बिहारमध्ये खऱ्या अर्थाने विकास होईल. तेजस्वी यादवजी बेरोजगारी कमी करणं हाच आपला खरा उद्देश असायला हवा.” अशा आशयाचं ट्विट करुन मनोज यादव यांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

बिहारमध्ये महाआघाडी विरूद्ध एनडीए असं राजकीय समीकरण आहे. एनडीएकडून नितीश कुमार यांच्यासह जदयू नेते व भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचार करत आहे. महाआघाडीचा प्रचाराचा भार मात्र, तेजस्वी यादव यांच्यावरच पडल्यासारखं चित्र आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत काही सभांना संबोधित केलं. मात्र, तेजस्वी यादव पायाला भिंगरी लावून राज्य पिंजून काढत आहेत. त्यांच्या सभांना होणारी गर्दी हाही चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, या गर्दीचं मतात किती परिवर्तन होणार हे निकालानंतरच कळणार आहे.