News Flash

नुसतंच बोलबच्चन नाही तर कृतीसुद्धा; अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलं रक्तदान!

सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली पोस्ट

सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे देशात अनेक ठिकाणी विविध वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचे जीव जात आहे, रक्ताचा साठा अत्यल्प आहे. अनेक सेलिब्रिटीही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांना मदत करत आहेत. अशातच आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही या कामात आपला सहभाग नोंदवला आहे. तिने रक्तदान केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिने याबद्दल माहिती दिली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते, “अभिमानाने आरश्यात बघता आलं पाहिजे असं माझे बाबा म्हणायचे. झाकल्या मुठीने मदत केली की लोक म्हणणार तुम्ही काहीच करत नाही..केलेली मदत दाखवली की म्हणणार पब्लिसिटी साठी केली….जमेल तशी केली की म्हणणार एवढीशी का केली ? पण ‘तेवढीशी ‘ का होईना केली ना, किमान हातावर हात धरून तर नाही बसलो….!समाजकल्याण करताना कॅमेरा घरी ठेवायचा( ही पण माझ्या बाबांची शिकवण )पण आजच्या डिजिटल युगात जाहीर करावं लागतं. कारण कलाकार कॅमेराच्या मागेही अभिनयच करत असतो असं बहुतेकांना वाटतं…पण तसं नाही”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

ती पुढे म्हणते, “आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्याची जाण मला एक कलाकार म्हणून आहे, कारण मुळात कलाकार हा संवेदनशीलच असतो…समाजातील एकाला जरी माझ्या ह्या कृतीतून प्रेरणा मिळाली तरी माणूस म्हणून काहीतरी करू शकले याचं समाधान असेल. आपण चांगलं कर्म करत रहायचा…त्याची नोंद बाकी कुठे नाही, तरी ‘तिथे वर’ होत असते. तेव्हा, मला जमेल तसं, जमेल तेव्हा झाकल्या मूठीने ( जसं गेले अनेक वर्ष करत आले ) आणि आता जमेल तेव्हा जाहीर करून मदत करत राहीन. कारण मी आजही ‘स्वतःला अभिमानाने आरशात बघते”.’

तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधव,प्रियदर्शन जाधव, सुयश टिळक, अभिनेत्री ऋतुजा बागवे, धनश्री काडगावकर, अक्षया देवधर, अपूर्वा नेमळेकर यांनी तिचं कौतुक केलं आहे. तिच्या अनेक चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.
कमी वेळात तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत आणि लोकांच्या कौतुकाचा विषय होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 4:00 pm

Web Title: tejaswini pandit donated blood posted it on social media vsk 98
Next Stories
1 सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट
2 आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीला करोनाची लागण, पोस्ट शेअर करत म्हणाली…
3 श्रवण यांच्या निधनानंतर नदीम यांची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण
Just Now!
X