News Flash

“देशाला लागलेली करोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण”- तेजस्विनी पंडीतचा संताप

इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून झाली व्यक्त

देशात करोनाचा कहर वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या अधिकाधिक वाढत आहे. अशात लसींचा तुटवडा, रेमडेसिवीर औषधाची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे. या सगळ्यात रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. या करोना संकटासंदर्भात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने एक पोस्ट केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या.”

तेजस्विनीने आपला संताप या माध्यमातून व्यक्त केला आहे. यापूर्वीही काही कलाकारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. अभिनेता संदीप पाठकनेही सरकारवर सवाल उपस्थित केला होता. महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असताना लसींचा पुरवठा कमी का? असा सवाल त्याने उपस्थित केला होता.

सध्या देशातली करोनाची स्थिती गंभीर आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासात देशात २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

राज्यातील करोनाची स्थितीही गंभीर आहे. रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. त्यामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन जरी नसला तरी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 7:56 pm

Web Title: tejaswini pandit said politics in country is the pest to the country vsk 98
Next Stories
1 राजकुमार हिरानीचे दोन नवे चित्रपट; एकात किंग खान तर एकात रणबीर कपूर
2 शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी पाहिलीत का? आई मीराने शेअर केले फोटो
3 आशुतोष राणानंतर पत्नी रेणुका शहाणे आणि मुलेही करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X