13 November 2019

News Flash

पुरुष साजरा करतील तेव्हाच खरा ‘वूमन्स डे’ – तेजस्विनी पंडित

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा एक अभिनेत्री ते...

तेजस्विनी पंडित

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा एक अभिनेत्री ते उद्योजिका बनून ‘तेजाज्ञा’ नावाचा साड्यांचा ब्रँड उभारेपर्यंतचा प्रवास खूपच लक्षवेधी असा आहे. तेजस्विनीचा हा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी असून, महिला दिनानिमित्त तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. महिलांना त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी कुठल्याही एका दिवसाची गरज नाही. खर तर वर्षातील सर्व दिवस त्यांनी स्वत:च स्वातंत्र्य साजर केलं पाहिजे. खरा ‘वूमन्स डे’ तेव्हा असेल जेव्हा पुरुष हा दिवस साजरा करतील. महिलांच्या आनंदाचा, मोठेपणाचा विचार करतील आणि त्यांचा आदर राखतील. पुरुष आणि स्त्री हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. माझ्या मते दोघांमधील समानताच एक सुखी आणि आनंदी जग घडवू शकते. महिलांसाठी एकच दिवस समर्पित करण्याबाबत नाखूष असलेल्या तेजस्विनीने अशा शब्दांत आपले मत व्यक्त केले.

Tejaswini Pandit तेजस्विनी पंडित

First Published on March 8, 2016 7:37 pm

Web Title: tejaswini pandit sharing her opinion on celebrating international womens day