News Flash

‘…तेव्हा सोबर फोटो टाकायचे’, बोल्ड फोटो शेअर केल्याने तेजस्वीनी पंडित झाली ट्रोल

या ट्रोलरला तेजस्वीनीने उत्तर देत सुनावले आहे.

सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कधी ते त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी सोशल मीडियाद्वारे माहिती देतात तर कधी फोटोशूटमधील फोटो शेअर करताना दिसतात. पण कधीकधी या कलाकारांना ट्रोलिंगचा देखील सामाना करावा लागतो. असेच काहीसे अभिनेत्री तेजस्वीनी पंडितसोबत घडले आहे. पण ती तेजस्वीनी देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.

नुकताच तेजस्वीनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा वनपिस परिधान केला असून ती बेडवर बसली आहे. या लूकमध्ये तेजस्वीनी छान दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘A Chameleon Soul’ असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला. पण काहींनी तिला ट्रोल केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

एका ट्रोलरने कमेंट करत तेजस्वीनीला ट्रोल केले आहे. त्याने कमेंट करत ‘जेव्हा पुरस्कारांची वेळ येते तेव्हा सोबर फोटो टाकायचे आणि बाकीच्या वेळेस हे असे…’ असे म्हटले आहे.

ही कमेंट पाहून तेजस्वीनी देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘बाकी वेळेस हे असे म्हणजे कसे? आणि मी अभिनेत्री आहे… दोन्ही दिसू शकते नाही का? सोबर पण आणि तुमच्या भाषेतील अशी पण’ असे तेजस्वीनीने कमेंटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 10:11 am

Web Title: tejaswini pandit slams troller avb 95
Next Stories
1 परवानगीविना छायाचित्र वापरणे बदनामीकारक
2 अपारशक्तीला कसली भीती वाटत आहे?
3 ‘हाथी मेरे साथी’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, एक रोमांचक लढाई
Just Now!
X