21 September 2018

News Flash

‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय दिव्यांकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर

दोन वर्षांपासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत

शरद मल्होत्रा, दिव्यांका त्रिपाठी

बॉलिवूडप्रमाणेच टेलिव्हिजन विश्वातही कलाकरांमध्ये असणाऱ्या नात्यांची समीकरणं बदलण्यास फारसा वेळ लागत नाही. नाती आकारास येण्यासाठी जितका जास्त वेळ लागतो तिक्चाय कमी वेळात या नात्यांना तडाही जातो. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांच्या नात्यातही असंच एक वळण आलं आणि या दोघांच्याही नात्याला तडा गेला. ब्रेकअपनंतर दिव्यांकाने विवेक दाहियासोबत विवाहबद्ध होत आपल्या नव्या आयुष्यास सुरुवात केली. आता शरदलाही त्याची ‘परफेक्ट मॅच’ सापडली आहे.

HOT DEALS
  • Lenovo K8 Note 64 GB Venom Black
    ₹ 10892 MRP ₹ 15999 -32%
    ₹1634 Cashback
  • Apple iPhone 8 Plus 64 GB Space Grey
    ₹ 70944 MRP ₹ 77560 -9%
    ₹7500 Cashback

‘पिंकव्हिला’शी बोलताना त्याने याविषयीचा खुलासा केला. ‘स्प्लिट्स्व्हिला’ फेम, अभिनेत्री पूजा बिश्त हीला शरद डेट करतोय. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जातेय. पूजासोबतच्या आपल्या रिलेशनशिपविषयी सांगताना शरद म्हणाला, ‘इतर सर्वसामान्य जोड्यांप्रमाणे आमच्यातही लहानमोठे खटके उडतात. पण, ते सर्व वाद क्षणिक असतात. मुळात पूजाही कलाविश्वात सक्रिय असल्यामुळे आमच्या नात्यात त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम पाहायला मिळतात. या क्षेत्रात आसणारा कामाचा ताण आणि इतर सर्वच गोष्टींबद्दल पूजा जाणून आहे ही एक चांगली गोष्ट. पण, आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा याच विषयावर आमच्या गप्पा सुरु असतात हीच एक वाईट गोष्ट आहे.’

फोटो गॅलरी: childrens day 2017 : ..या प्रसिद्ध मराठी कलाकारांना ओळखलंत का?…

शरद आणि पूजाच्या नात्यात सध्या आलेले स्थैर्य पाहता तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला असता मात्र शरदने त्या गोष्टीस अजून काही काळ जाईल असे स्पष्ट केले. ‘लग्नाच्या बाबतीत माझ्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड आहे. कारण माझ्या काही मित्रांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच अडचणी आल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत मी स्वत: या गोष्टीबद्दल मानसिकरित्या स्थिर होत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही. पण, पुढच्या वर्षीपर्यंत मी लग्नाचा विचार नक्कीच करेन’, असे तो म्हणाला. पुढचे वर्ष येण्यासाठी आता अवघे कही दिवसच शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे शरद आणि पूजा विवाहबंधनात कधी अडकणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published on November 14, 2017 12:35 pm

Web Title: television actor sharad malhotra on his relationship with actress pooja bisht you might hear wedding bells next year