कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत असे म्हणायल हरकत नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी कलाविश्वातील बऱ्याच अभिनेत्री, अभिनेत्यांनी लग्नगाठ बांधली आहे, कोणी लग्नाच्या बेडित अडकण्याच्या तयारीत आहेत, तर कोणाचा साखरपुडा होणार आहे. अशाच सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे आश्का गोरडिया. आश्का लवकरच विवाहबंधनात अडकणारअसून, टेलिव्हिजन विश्वात तिच्या लग्नाचा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही अभिनेत्री प्रियकर ब्रेंट गोबलेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ३ डिसेंबरला आश्काचा लग्नसोहळा पार पडणार असून, सध्या या सोहळ्याच्या तयारीला दणक्यात सुरुवात झाली आहे.

आयुष्यातील या खास क्षणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी ती फारच उत्सुक असून, बेंटही तिच्या आनंदाच सहभगी झाला आहे.. कोणत्याही नववधूसाठी विवाहसोहळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यासोबतच आणखी एका गोष्टीबद्दल ही नववधूच्या मनात प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता असते. ती गोष्ट म्हणजे लग्नसोहळ्यासाठीची वेशभूषा. आश्कासुद्धा सध्या तिच्या लग्नसोहळ्यासाठीचा लेहंगा निवडण्यामध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळाले होते. सरतेशेवटी त्या खास दिवसासाठी एक लेहंगा तिला फार आवडला असून, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अर्चना कोचरने तो डिझाईन केला आहे.

https://www.instagram.com/p/Bbw3q_5lafn/

हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या रंगसंगतीचा सुरेख मेळ साधत अर्चनाने या लेहंग्यामध्ये सुरेख नक्षीने ‘चार चाँद’ लावले आहेत. आश्काला हा लेहंगा फारच भावला असून, तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्या लेहंग्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने अर्चनाचे आभार मानले असून #EkPardesiMeraDilLeGaya असा हॅशटॅगही दिला आहे. तिच्या फॅनपेजवरुनही यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या फोटो आणि व्हिडिओमध्ये आश्का आणि बेंटच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. ३ डिसेंबरला आश्काच्या अहमदाबादमधील मूळ घरी हा विवाहसोहळा पार पडेल.

https://www.instagram.com/p/Bbw3OXanzhO/