28 February 2021

News Flash

सलमानसाठी ‘तिने’ पुरस्कार सोहळा अर्ध्यावरच सोडला

तिला कार्यक्रमात एक पुरस्कारही मिळणार होता.

सलमान खान

कलाविश्वात नवोदित कलाकार आपल्या मनी बऱ्याच इच्छा बाळगून येतात. या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकदा त्यांना याच कलाविश्वात नावाजलेल्या मंडळींची प्रचंड मदत होते. नवोदित कलाकारांच्या मदतीला धावून जाणारा असाच एक अभिनेता म्हणजे सलमान खान. सोनाक्षी सिन्हापासून सूरज पांचोलीपर्यंत अनेकांच्या करिअरला हातभार लावणारा सलमान सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय हिलाही या कलाविश्वात ओळख मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे आपल्या प्रेरणास्थानी असलेल्या सलमानप्रतीही मौनीने तिची जबाबदारी ओळखली आहे.

‘स्पॉटबॉय ई’च्या वृत्तानुसार सलमानसाठी मौनीने ‘ब्राईट परफेक्ट अचिवर्स अवॉर्ड्स’चा कार्यक्रम अर्ध्यावरच सोडत पनवेलला भाईजान सलमानच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. मुख्य म्हणजे या कार्यक्रमात मौनीला एक पुरस्कारही मिळणार होता. पण, सलमानच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला हजेरी लावण्याला प्राधान्य देत तिने या पुरस्काराकडेही दुर्लक्ष केल्याचे कळते. मौनीच्या या कृतीमुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आलेल्या मौनीने माध्यमांशी संवादही साधला होता. पण, कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी ठरल्याप्रमाणे होत नसल्याचे आणि बराच वेळ दवडला जात असल्याचे लक्षात येताच मौनीने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. सध्या मौनी तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली असून, खिलाडी कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून ती झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 11:38 am

Web Title: television actress mouni roy shuns her award to be with tiger zinda hai fame actor salman khan
Next Stories
1 …म्हणून सेल्फी काढण्यास जान्हवीची टाळाटाळ
2 ‘पद्मावती’वर मेवाडच्या राजघराण्याची नाराजी
3 TOP 10 NEWS: टायगरच्या फिटनेस मंत्रापासून एकताच्या विचित्र अटीपर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर
Just Now!
X