News Flash

…अन् प्रिन्स नरुला तिला म्हणाला, ‘डोली सजा के रखना’

त्या दोघांनीही आपले रिलेशनशिप अधिकृतपणे सर्वांसमोर आणले

प्रिन्स, युविका

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या रिलेशनशिपविषयी गुप्तता पाळणाऱ्या या प्रेमी युगुलाने अखेर आपण, ‘एन्गेज्ड’ झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनाच सांगितले आहे. प्रिन्स आणि युविकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सुरेख फोटो पोस्ट करत त्यांच्या नात्याची ग्वाही देणाऱ्या अंगठ्या सर्वांनाच दाखवत याविषयीची माहिती दिली. त्या दोघांनीही या पोस्ट केल्यानंतर विकास गुप्ता, रणविजय सिंघा, नेहा धुपिया यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

युविकाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रिन्सने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नावही ‘प्रिन्स युविका नरुला’ असे ठेवले आहे. त्याचा हा अंदाज युविकासोबतच अनेक तरुणींची मनं जिंकून गेला असणार यात वाद नाही. ‘एमटीव्ही रोडिज’, ‘स्प्लिट्सव्हिला’, ‘बिग बॉस’ यांसारख्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या प्रिन्सने फार कमी कालावधीतच या कलाविश्वात स्वत:चे स्थान निर्माण केले. ‘बढो बहू’ या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजन विश्वात तो एक अभिनेता म्हणूनही चांगलाच नावारुपास आला.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

प्रिन्स आणि युविका गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या रिलेशनशिपविषयी यापूर्वीपासूनच अनेकांनाच अंदाज होता. त्या दोघांनीही कधीच उघडपणे आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण, आता मात्र तसे नाहीये. प्रिन्सने युविकासोबतचा एक फोटो पोस्ट करत ‘डोली सजा के रखना…’ या गाण्याची ओळ लिहिली आहे. तर युविकाने या अनोख्या नात्याची सुरुवात झाल्याबद्दल आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. प्रिन्सने केलेली ही पोस्ट आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता, आता येत्या काळात त्याच्या आणि युविकाच्या लग्नाचे सनई चौघडे ऐकायला मिळणार असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 12:26 pm

Web Title: television celebrity prince narula and bae yuvika chaudhary are engaged see photos
Next Stories
1 Top 10 News- ‘पद्मावत’च्या वादापासून नाट्य परिषदेच्या निवडणूकीपर्यंत…
2 जाणून घ्या ‘पद्मावत’ पाहण्यामागची पाच कारणं
3 Oscars 2018 : १३ नामांकनं मिळवणाऱ्या ‘द शेप ऑफ वॉटर’सह ही आहे यंदाच्या ऑस्कर नामांकनाची संपूर्ण यादी
Just Now!
X