News Flash

‘बिग बॉस १५’ मध्ये करण जोहरला होस्ट म्हणून बघायला उत्सुक आहे हिना खान, पण….

हिना खान म्हणाली, "मी करण जोहर ची फॅन आहे मात्र एका गोष्टीमुळे मला चिंता वाटते......."

hina-khan-biggboss
Photo-loksatta file photo

छोट्या पडद्यावरचा विवादित मात्र तेव्हढाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. हा शो लवकरंच त्याचा १५ वा सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या वेळेस ‘बिग बॉस’मध्ये थोडे बदल करण्यात आले आहे. हा सीजन सुरूवातीला ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येईल. त्यानंतर टीव्हीवर प्रदर्शित होईल. ‘बिग बॉस’ ओटीटी व्हर्जनचे सूत्रसंचालन प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. करण ‘बिग बॉस’शो होस्ट करणार हे कळताच ‘बिग बॉस ११’ची स्पर्धक हिना खानने आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘बिग बॉस’ ओटीटीमध्ये करणला होस्ट म्हणून पाहण्यासाठी हिना खान उत्सुक आहे. मात्र तिला एक चिंता सतावत आहे.

‘बिग बॉस ११’मध्ये हिना खान महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. या शोमुळे हिना खानला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. ‘बिग बॉस १५’ आणि करण बद्दल बोलताना हिना खानने सांगितले की, “मी करण जोहरची फॅन आहे आणि त्याला होस्ट म्हणून बघायला खूप उत्सुक आहे.” मात्र एका गोष्टीमुळे चिंतेत असल्याचे देखील हिनाने त्या मुलाखतीत सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

“बिग बॉस बघायला सगळ्यांनाच मजा येते. मात्र त्या घरात एवढे दिवस रहायचं म्हणजे खायची गोष्ट नाही. मी त्या घरात राहिली आहे. त्यामुळे मी समजू शकते. आता हे स्पर्धक ६ महिने या घरात राहणार आहेत, जे खूप हेक्टीक असणार आहे. आणि याचीच मला चिंता आहे”, असे हिना खान म्हणाली. हिना खान ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीजनमध्ये गेस्ट कंटेस्टंट म्हणून आली होती. तिच्यासोबत सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खान देखील दिसले होते.

दरम्यान, करण जोहर त्याच्या ‘बिग बॉस १५’ शो बद्दल बोलताना म्हणाला की, “माझी आई आणि मी बिग बॉसचे खूप मोठे फॅन आहोत……एक ही दिवस आम्ही हा शो मिस करत नाही ..…एक प्रेक्षक या नात्याने मला हा शो खूप मनोरंजनात्मक वाटतो. हा शो होस्ट करणं मला आवडेल…आणि आता बिग बॉस ओटीटी…ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे…” बिग बॉस ओटोटीचा प्रिमियर येत्या ८ ऑगस्ट रोजी डिजिटल प्लॅटफॉर्म वूट वर रिलीज होणार आहे. सुरूवातीचे सहा आठवडे ‘बिग बॉस’ ओटीटीवर करण जोहर होस्ट करताना दिसेल. त्यानंतर बिग बॉस १५ पुन्हा त्याच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच कलर्स चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 8:31 pm

Web Title: television popular actress hina khan says she is excited about karan hosting bigg boss but aad 97
Next Stories
1 ‘तारक मेहता…’ला १३ वर्षे पूर्ण, या वेळेस कलाकार नाही तर दिग्दर्शक होतोय ट्रेंड
2 मुलीच्या शाळेची फी सुद्धा भरू शकला नाही ‘हा’ अभिनेता; अनिल कपूर, सलमान खानसोबत केलंय काम
3 ‘प्लॅनेट टॅलेन्ट’मध्ये सोनपरीचा सहभाग; प्रेक्षकांसाठी मृणाल कुलकर्णी घेऊन येणार खास भेट
Just Now!
X