News Flash

चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रीवरच कुत्रा पिसाळला अन्…

तिने हातातील काठीने त्याला मारण्यास सुरुवात केली, पण...

प्राची तहलान

प्रेक्षकांपर्यंत कोणतीही कलाकृती अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कलाकार नेहमीच प्रयत्नशील असतात. फक्त चित्रपटच नव्हे, तर मालिकांमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी आणि एखाद्या गोष्टीचा प्रभाव पाडण्यासाठी चित्रीकरणादरम्यान नवनवीन प्रयोग करण्यात येतात. पण, हे प्रयोग अनेकदा फसून कलाकारांसाठीच धोक्याचे ठरतात. याचच उदाहरण काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं.

स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इक्यावन’ या मालिकेच्या सेटवर एक दुर्घटना घडली, ज्यांमध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री प्राची तहलानला चक्क एका जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याचा सामना करावा लागला. मालिकेतील एका दृश्याच्या चित्रीकरणासाठी सेटवर जर्मन शेपर्ड आणण्यात आला होता. ज्याच्यासोबत प्राचीला चित्रीकरण करायचं होतं. पण, यादरम्यानच तो कुत्रा पिसाळला आणि प्राचीच्या अंगावर धावून गेला. अवघ्या काही क्षणांत हे सर्व घडत असल्यामुळे प्रियाला काय करावं बेच कळत नव्हतं. तोपर्यंत कुत्रा तिला चावला होता.

‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून तिने हातातील काठीने त्याला मारण्यास सुरुवात केली, ज्यानंतर तो कुत्रा पळून गेला. ‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्राचीला या दुर्घटनेनंतर लगेचच डॉक्टरंकडे नेण्यात आलं. कुत्रा चावल्यामुळे प्राचीला बऱ्याच यातना सहन कराव्या लागत आहेत. मुळात तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असूनही ती मालिकेच्या पुढच्या भागांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 10:08 am

Web Title: television serial ikyawann actress prachi tehlan badly attacked by a dog during shoot
Next Stories
1 आपण यांना ओळखलंत का?
2 रामलीलामध्ये सीताची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रवि किशनचे असे बदलले नशीब
3 पठडीबाहेरच्या सिनेमांनी एप्रिल ‘फुल्ल’
Just Now!
X