News Flash

PHOTOS : तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचा साखरपुडा

आपल्या नात्याबद्दल या दोघांनीही गुप्तता पाळण्यालाच प्राधान्य दिलं होतं

छाया सौजन्य- इन्सटाग्राम

टेलिव्हिजन विश्वात सध्या प्रेमाचेच वारे वाहात असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम या सेलिब्रिटी कपलने लग्न केल्यानंतर रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत जून महिन्यात लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. या सेलब्रिटी कपल्सच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचं आणि त्याच्या प्रेयसीचं नाव जोडलं गेलं आहे. तो अभिनेता म्हणजे कुणाल जयसिंग. ‘इश्कबाज’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या आणि विशेषत: तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता कुणाल जयसिंगचा साखरपुडा झाला आहे. ओमकारा हे पात्र साकारणाऱ्या कुणालने त्याची प्रेयसी भारती कुमार हिच्यासोबत साखरपुडा करत एका नव्या प्रवासाची सुरुवात झाल्याचा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.

जुहू येथील इस्कॉन मंदिरात कुटुंबियांच्या उपस्थितीत कुणाल आणि भारतीचा साखरपुडा पार पडला. खुद्द कुणालनेच साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयी सर्वांना माहिती दिली. यावेळी कुणाल आणि भारती या दोघांनीही पारंपरिक पण, हलकासा मॉडर्न टच असलेल्या वेशभूषेला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. साखरपुड्यासाठी कुणालने आकाशी रंगाची शेरवानी घातली होती, तर भारती पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये त्याला शोभून दिसत होती.

‘द बडी प्रोजेक्ट’च्या सेटवर भारती आणि कुणाल एकमेकांना भेटले होते. सुरुवातीला काही दिवसांच्या मैत्रीनंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, आपल्या नात्याबद्दल या दोघांनीही बऱ्यापैकी गुप्तता पाळण्यालाच प्राधान्य दिलं. जवळपास पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर कुणाल आणि भारतीने आयुष्याचा हा प्रवास एकमेकांच्या साथीनेच व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 3:28 pm

Web Title: television serial ishqbaaaz fame actor kunal jaisingh gets engaged to long time girlfriend bharati kumar see photos
Next Stories
1 आइस्क्रिम भरवत किंग खान कतरिना म्हणाला, ‘आय लव्ह यू’
2 ..अन् बिग बींना मागावी लागली दिनेश कार्तिकची माफी
3 ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री साकारणार प्रियांका गांधींची भूमिका
Just Now!
X