वादग्रस्त कार्यक्रम आणि कार्यक्रमाचं आगळवेगळं स्वरुप यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या १२ व्या पर्वासाठी ‘बिग बॉस’च्या घरात नेमका कोणाचा प्रवेश होणार याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. किंबहुना त्यादृष्टीने काही सेलिब्रिटींची नावंही समोर येत आहेत. अशाच सेलिब्रिटींच्या यादीत सध्या ब्रिटीश पॉर्न स्टार डॅनी डी याच्या नावाचाही समावेश झाला आहे. तो सहकलाकार महिका शर्मा हिच्यासोबत ‘बिग बॉसम’ध्ये येणार असल्याच्या चर्चा आहेत.
मुख्य म्हणजे डॅनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय होणार असून, त्याच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘द मॉडर्न कल्चर’ असणार असल्याचं कळत आहे. ज्यामध्ये माजी ‘मिस टीन नॉर्थइस्ट इंडिया’, महिका शर्मा झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला डॅनी आणि महिच्या मैत्रीपूर्ण नात्याची बरीच चर्चा होत आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाविषयी आपलं मत मांडत डॅनी म्हणाला होता, ”या चर्चांना सुरुवात झाल्यापासूनच मला चाहत्यांनी त्याविषयीचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. खरं सांगायचं तर, मी ‘बिग बॉस’ किंवा ‘बिग ब्रदर’ यापैकी कोणताच कार्यक्रम पाहिलेलला नाही. मला फक्त एवढच माहितीये की एका घरात आपण बंधिस्त असतो आणि सतत आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर असते. माझ्या मॅनेजरकडून मिळालेल्या माहितीनुसार मला अशाच एका कार्यक्रमाची विचारणा करण्यात आली आहे. सध्यातरी त्याविषयी बोलणी सुरु आहेत. याविषयीचा निर्णय मी दोन व्यक्तींवर सोपवला आहे. ‘बिग बॉस’ हे भारतात होणार असेल तर मी महिकासोबत या घरात जाऊ इच्छितो.’ या वक्तव्यासोबतच डॅनीने आता सर्व गोष्टी महिकावर सोपवल्या आहेत. तेव्हा आता ‘बिग बॉस’च्या घरात हे दोघं प्रवेश करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्य म्हणजे डॅनी या घरात आल्यानंतरही त्याला आर्थिकदृष्ट्या याचा काही फायदा होणार का, यावरच आता त्याचे मॅनेजर लक्ष देत आहेत. तेव्हा आता सलमानला भेटण्यासाठी उत्सुक असलेला आणि ‘बिग बॉस’च्या घरात येण्यासाठी सकारात्म दृष्टीकोन ठेवणारा डॅनी या कार्यक्रमात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 4:25 pm