News Flash

हे सेलिब्रिटी कपल त्यांची अॅनिव्हर्सरी विसरले आणि…

गेल्या आठ वर्षांपासून हे दोघं एकमेकांसोबत आहेत.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

टेलिव्हिजन विश्वातील काही गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता राज सिंग अरोरा आणि अभिनेत्री पूजा गोर. टेलिव्हिजन विश्वात गेल्या बऱ्याच दिवसांपासून काही सेलिब्रिटींच्या ब्रेकअपच्या चर्चा येत असतानाचा पूजा आणि राज मात्र याला अपवाद ठरत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून हे दोघं एकमेकांसोबत आहेत. त्यासंबंधीचा आनंद त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. पण, हा यानंद सेलिब्रेट करण्यापूर्वी हे दोन्ही कलाकार त्यांची अॅनिव्हर्सरीच विसरले होते.

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन पोस्ट केलेल्या फोटोमध्येच याबद्दलचा खुलासा केला आहे. या प्रसिद्ध टेलिव्हिजन कपलच्या एका मैत्रिणीने पूजाला त्यांच्या अॅनिव्हर्सरीची आठवण करुन दिली आणि त्यानंतर तिने एक सुरेख फोटो पोस्ट करत आठ वर्षांच्या रिलेशनशिपचा आनंद व्यक्त केला आहे. तिने एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘दीपिकाने (मैत्रीणीने) मला आताच आपण एकत्र येऊन आठ वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करुन दिली. मी खरंच हे विसरुन गेले होते. मला वाटतंय तूसुद्धा विसरलास. खरंच आपण कसे आहोत अरे… दोघंही विसरुनच गेलो. असो. खूप खूप अभिनंदन राज.’ पूजाने या कॅप्शनमध्ये राजने दिलेल्या साथीबद्दल त्याचे आभारही मानले आहेत.

पूजा गोर आणि राज सिंग अरोरा टेलिव्हिजन विश्वातील नावाजलेले चेहरे आहेत. ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून राजने मिहिर अरोरा ही भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेभकांची दाद मिळवून गेली होती. पूजासुद्धा मालिका विश्वात बरीच प्रसिद्ध आहे. ‘कितनी मोहोब्बत है’, ‘प्रतिज्ञा’ या मालिकांतून पूजाचा चेहरा प्रकाशझोतात आला होता. गेल्या आठ वर्षांपासून राज आणि पूजाचं हे नातं खुलत आहे. त्यामुळे चाहत्यांनीही या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:01 pm

Web Title: televisoin celebrity couple raj singh arora and pooja gor completed 8 years of togetherness and forgot their anniversary
Next Stories
1 शाहरुख, नवाजुद्दीन अडचणीत; ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव
2 अक्कासाहेबांच्या ‘पुढचं पाऊल’ला पूर्णविराम
3 PHOTO : ..या आहेत सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिका
Just Now!
X