News Flash

प्रसुतीच्या ७ दिवस आधी अभिनेत्रीला करोनाची लागण, “तो काळ माझ्यासाठी..”

'माझ्या बाळाला लगेच...'

‘बिग बॉस’ फेम तेलगू अभिनेत्री हरि तेजा हिने पाच एप्रिलला एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेलगू बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची फायनलिस्ट असलेल्या हरि तेजाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आई झाल्याचा आनंद व्यक्त केला. हरि तेजाने पती दिपकसोबत सुंदर फोटो शेअर करत बाळाच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

मात्र या अभिनेत्रीचा आई होण्याचा प्रवास सोपा नव्हता. हरि तेजा गरोदर असताना प्रसुतीच्या ७ दिवस आधीच तिला करोनाची लागण झाली. काही आठवडे लोटल्यानंतर हरि तेजाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडीओ शेअर केलाय. प्रसूतीच्या वेळी तिच्यासह घरातील सर्वांनाच करोनाची लागण झाल्याने तो काळ खूप वेदनादायी असल्याचं सांगताना अभिनेत्रीचे डोळे पाणावले.

हरि तेजा तिच्या व्हिडीओमध्ये म्हणाली, “कोव्हीड वॉर्डमध्ये मी अगदी एकटी होते. भीती आणि चिंता दोन्ही सतावत होती.” असं ती व्हिडीओत म्हणाली आहे. शिवाय बाळाचा जन्म होताचे ते तिच्यापासून दूर नेण्यात आल्याचंही तिने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hari Teja (@actress_hariteja)

पुढे ती म्हणाली, ” अनेकांना मला आई होणार म्हणून शुभेच्छा दिल्या. मात्र मला कुणाचेही आभार मानता आले नाहित. कारण माझ्या प्रसुतीच्या एक आठवडा आधी माझ्यासह सर्वांना करोनाची लागण झाली. कदाचित मी काळजी घेण्यात कमी पडले. सगळयांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. तर कोव्हिड वॉर्डमध्ये मी एकटीच होते. खरं तर हा आनंदाचा क्षण असतो. पण यावेळी मला एकटीलाच संघर्ष करावा लागला. जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा माझ्यापासून लगेच दूर नेण्यात आलं. हे खूप वेदनादायी होतं. ” हे सांगताना हरि तेजाला रडू आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय.

वाचा:“आधी तुझ्या भावाला सांग”; ‘त्या’ पोस्टनंतर करीना कपूर झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Hari Teja (@actress_hariteja)

नुकताच तिने बाळासोबतचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 2:11 pm

Web Title: telgu actress hari teja share emotional video as she was tested covid positive before her delivery goes viral kpw 89
Next Stories
1 अभिमानास्पद! करोना रुग्णांच्या मदतीसाठी सुपरस्टार बनला रुग्णवाहिका चालक
2 फोटो काढायला आलेल्या चाहत्यावर संतापली सारा, जाणून घ्या कारण
3 दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद यांच निधन
Just Now!
X