दाक्षिणात्य अभिनेता निखिल सिद्धार्थने लॉकडाउनदरम्यान गुरुवारी लग्नगाठ बांधली. पल्लवी वर्माशी निखिलने लग्न केलं असून ती डॉक्टर आहे. या दोघांचं लग्न एप्रिल महिन्यात होणार होतं. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन यांमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
निखिल आणि पल्लवी लॉकडाउन संपल्यानंतर लग्नगाठ बांधणार होते. मात्र ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार लग्नाला आणखी विलंब करण्याला दोघांच्याही पालकांचा विरोध होता. त्यामुळे लॉकडाउनमध्येत अगदी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत निखिल व पल्लवीने आयुष्याच्या आणाभाका घेतल्या.
या लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. उपस्थित पाहुण्यांसाठी मास्क व सॅनिटाइजरचीही व्यवस्था करण्यात आली होती. लॉकडाउन संपल्यानंतर चित्रपटसृष्टीतील मित्रपरिवारासाठी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती निखिलने दिली.
आणखी वाचा : घरकाम करणाऱ्या महिलेला किस केल्याने शिल्पा शेट्टीकडून पतीची धुलाई
फेब्रुवारी २०२० मध्ये निखिल व पल्लवीचा साखरपुडा झाला. हे दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. निखिलने ‘कार्तिकेय’, ‘स्वामी रा रा’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी डेज’ या चित्रपटामुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 4:48 pm