News Flash

दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या; मित्राविरोधात पोलीस तक्रार दाखल

मनोरंजनसृष्टीला आणखी एक धक्का; अभिनेत्रीने गळफास लावून संपवलं आयुष्य

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती २६ वर्षांची होती. हैदराबादच्या मधुनगर येथील राहत्या घरी बाथरूमध्ये लटकलेल्या अवस्थेत ती आढळली. दरम्यान तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया इस्पितळात नेण्यात आला आहे. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

श्रावणीच्या कुटुंबीयांनी देवराज रेड्डी नावाच्या एका व्यक्तीविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. देवराज हा श्रावणीचा मित्र होता. परंतु तो तिला मानसिक त्रास देत होता. त्यानेच तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. देवराजच्या त्रासाला कंटाळून श्रावणीने हे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली

श्रावणी कोंडापल्ली ही दाक्षिणात्य टीव्ही सृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होती. ‘मनसु ममता’ या टीव्ही मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेल्या आठ वर्षांपासून श्रावणी टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती. त्यामुळे तिच्या मृत्यूमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 4:20 pm

Web Title: telugu actor sravani kondapalli dies by suicide mppg 94
Next Stories
1 मुंबईत पोहोचताच कंगनाची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली…
2 “करोना सोडून नको त्या विषयांवर चर्चा सुरु आहेत”; उर्मिला मातोंडकरने व्यक्त केली नाराजी
3 मुलींचं भावनाविश्व उलगडणारा ‘विस्टल ब्लोईंग सूट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X