News Flash

“ड्रग्स घेतल्याशिवाय पार्टी संपत नाही”; अभिनेत्रीने सांगितलं सिनेसृष्टीचं डार्क सिक्रेट

कंगना रणौतनंतर आणखी एका अभिनेत्रीने ड्रग्स पार्टींविरोधात उठवला आवाज

भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात असे आरोप सातत्याने केले जातात. अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडमधील ड्रग्स पार्टींचा मुद्दा उचलून धरला आहे. सातत्याने ती या विरोधात टीका करत आहे. दरम्यान तिच्या या भूमिकेला दाक्षिणात्य अभिनेत्री माधवी लता हिने पाठिंबा दिला आहे. टॉलिवूड सिनेसृष्टीतील कुठलीच पार्टी ड्रग्स घेतल्याशिवाय संपत नाही, असं खळबळजनक विधान तिने केलं आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात क्राईम ब्रँचने अभिनेत्रीला बजावलं समन्स

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका तमिळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सिनेसृष्टीतील ड्रग्स पार्टींवर भाष्य केलं. ती म्हणाली, “दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक मोठे कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. टॉलिवूडमधील कुठलीच हायप्रोफाईल पार्टी ड्रग्स घेतल्याशिवाय संपत नाही. अर्थात या गोष्टी पोलीस प्रशासनाला देखील माहित असतात. परंतु त्या कलाकारांचे राजकिय हितसंबंध असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.”

अवश्य पाहा – नरेंद्र मोदींचं अकाउंट हॅक करणारा ‘जॉन विक’ कोण आहे?

अलिकडेच क्राईम ब्रँचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती एक डायरी देखील लागली. या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. यापैकी एक नाव प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिचं देखील आहे. योगायोग म्हणजे असाच काहीचा प्रकार मुंबईत देखील घडला. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असताना अंमली पदार्थविरोधी पथकाने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर माधवी लता हिने केलेले आरोप सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 1:34 pm

Web Title: telugu actress madhavi latha claims no party exists without drugs in tollywood mppg 94
Next Stories
1 ‘रसोडे मे कौन था’ फेम यशराजने ‘बिग बॉस’ला दिला नकार; म्हणाला…
2 No Time To Die Trailer : बॉण्ड… जेम्स बॉण्ड… हो तो पुन्हा आलाय
3 “मुंबईने लाखो लोकांना नाव, प्रसिद्धी दिली पण…”, उर्मिलाची कंगनावर टीका
Just Now!
X