देशभरात करोना लसीकरण सध्या वेगाने सुरु आहे. लसीकरणाच्या या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयोगटातल्या तसंच ४५ ते ५९ वयोगटातल्या सहव्याधी असणाऱ्या सर्वांना लस देण्यात येणार आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्धा ही लस घेतली आहे. तेलुगू अभिनेता नागार्जुन यांनीही लस घेतली आहे.
हैद्राबादमधल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नागार्जुन अक्किनेनी या अभिनेत्याने कोवॅक्सिन या करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तेलुगू चित्रपटसृष्टीतला लस घेणारे नागार्जुन हे पहिलेच सुपरस्टार आहे.
आज सकाळी नागार्जुन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.
Got my #covaxin jab yesterday .. absolutely no down time I urge whoever is eligible to take the vaccine!!
You can now register for your #Covid19vaccine at https://t.co/Rm3ZUrv1Kx Book your vaccine. and get it done! #Unite2FightCorona#VaccineVarta@MoHFW_India @BMGFIndia pic.twitter.com/B4wjGoKLjx— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) March 17, 2021
त्याचबरोबर त्यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहनही केले आहे. ते म्हणतात, “कोवॅक्सिनची पहिली मात्रा आज मी घेतली. लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांना मी लस घेण्याची विनंती करतो.” त्याचबरोबर त्यांनी लसीकरणासाठी करण्यात येणाऱ्या रजिस्ट्रेशनसाठीची लिंकही शेअर केली आहे. स्वतःचा वॅक्सिन घेतानाचा फोटोही त्यांनी यासोबत शेअर केला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार्स मोहनलाल आणि कमल हसन यांनीही नुकताच करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.
नागार्जुन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाईल्ड डॉग हा त्यांचा नवा ऍक्शनपट येत्या २ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर ते सध्या अजून एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. याचं दिग्दर्शन प्रविण सत्तारू हे करत आहेत तर या चित्रपटात नागार्जुन यांच्यासोबत अभिनेत्री काजल अग्रवालही दिसणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 12:01 pm