प्रसिद्ध तेलगु टीव्ही सूचसंचालक प्रदीप मचीराजूला नवीन वर्षी मद्यपान करुन गाडी चालवल्या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी त्याला पकडले. स्वतः ‘ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह’मध्ये प्रदीप अडकलेला असताना, त्याचा मद्यपान करुन गाडी चालवणे किती धोकादायक आहे हे सांगणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो तरुणांना दारु पिऊन गाडी चालवणे किती धोकादायक आहे याचे उपदेश देताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BYyvaUoAHCJ/

या व्हिडिओमध्ये प्रदीप म्हणतो की, माझ्या सर्व तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो की, मद्यपान करुन गाडी चालवू नका. असे केल्यास फक्त तुमच्याच जीवाला नाही तर दुसऱ्यांच्या जीवालाही धोका आहे. तुमचं आयुष्य फार अनमोल आहे. यामुळेच मद्यपान करुन गाडी चालवू नका. सीट बेल्ट लावा आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळा. या व्हिडिओमधील मेसेज चांगला आहे पण प्रदीप स्वतः हे नियम पाळत नसल्यामुळे सोशल मीडियावर तो सध्या चांगलाच ट्रोल होत आहे.

https://www.instagram.com/p/BaDuDqpgUnO/

https://www.instagram.com/p/BdAUzJUH9PJ/