News Flash

‘तुझ्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला’; हॉलिवूड दिग्दर्शकानं मानले डिंपल कपाडियांचे आभार

जगातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकानं पाठवलं खास पत्र

ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. आजवर त्याने ‘डंकर्क’, ‘इन्सेप्शन’, ‘द प्रेस्टिज’, ‘मेमेंटो’, ‘डार्क नाईट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रेक्षक त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात त्यामुळेच त्याला सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हटलं जातं. अलिकडेच ख्रिस्तोफरचा टेनेट हा चित्रपट प्रदर्शित झाला. करोनाग्रस्त वातावरणातही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. मात्र या चित्रपटानं मिळवलेल्या यशाचं श्रेय त्याने अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना दिलं आहे. नोलननं त्यांचे आभार मानण्यासाठी एक खास पत्र लिहिलं आहे. अक्षय कुमारनं हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

अवश्य पाहा – ‘बिग बॉस १४’ जिंकणार कोण? या ४ स्पर्धकांना मिळालं अंतिम फेरीचं तिकिट

“डिंपल तुझ्याबाबत मी काय बोलू, तुझ्यासोबत काम करणं हा खूपच आनंददायी अनुभव होता. प्रिया ही व्यक्तिरेखा उत्कृष्ट पद्धतीने तू साकारलीस. तुझ्या अभिनय कौशल्यामुळे टेनेट हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर गेला. तुझे मनापासून आभार.” अशा आशयाचं पत्र ख्रिस्तोफर नोलन यानं डिंपलं कपाडिया यांना लिहिलं आहे. त्यांनी या चित्रपटात प्रिया ही एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.

अवश्य पाहा – ‘माझ्या यशाच्या आड येऊ नकोस, अन्यथा…’; एक्स बॉयफ्रेंडला पवित्राचा इशारा

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अवश्य पाहा – VIDEO: रिअल लाईफ सुपरहिरो; अभिनेत्याने डोळ्यांवर ओतलं वितळतं मेण

टेनेट हा चित्रपट ३ सप्टेंबर रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा वेळ या संकल्पनेवर आधारित आहे. लक्षवेधी बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. ४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 3:58 pm

Web Title: tenet dimple kapadia christopher nolan akshay kumar mppg 94
Next Stories
1 ‘रावण खलनायक नव्हता’; सैफ अली खान होतोय ट्रोल
2 बॉलिवूडमध्ये सतत रिमेकच का होतात? अर्शद वारसी म्हणाला…
3 ‘आजवर २० जणांना तरी मदत केलीस का?’; कंगनाला मिक्का सिंगचा उपरोधिक टोला
Just Now!
X