News Flash

कार्तिक आर्यन झळकणार ‘तेरे नाम’च्या सिक्वलमध्ये? नवा लूक होतोय व्हायरल…

'तेरे नाम'साठी मिळाला नवा राधे?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो आपल्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. कार्तिकच्या या नव्या लूकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या लूकची तुलना ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमान खानच्या लूकशी केली जात आहे.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

 

View this post on Instagram

 

Some change in the planetary position today. OMG #kartikaaryan steps out of his cocoon. #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्तिकचा हा नवा लूक पाहून तो ‘तेरे नाम’च्या सिक्वलमध्ये झळकणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ‘तेरे नाम’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट जबरदस्त गाणी आणि सलमान खानची हेअर स्टाईल यामुळे चर्चेत होता. ही हेअर स्टाईल त्यावेळी इतकी गाजली होती की अगदी सर्वसामान्य चाहत्यांपासून क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी या लूकचं अनुकरण केलं होतं. या पार्श्वभूमीवर कार्तिकचा हा नवा लूक सध्या सर्वांच्याच भुवया उंचावत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:15 pm

Web Title: tere naam salman khan kartik aaryan mppg 94
Next Stories
1 मुकेश खन्नांच्या टीकेवर अखेर कपिल शर्माने सोडलं मौन; म्हणाला…
2 ‘कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव’; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ
3 विजय सेतुपतीची मुथ्थया मुरलीधरनच्या बायोपिकमधून माघार
Just Now!
X