07 March 2021

News Flash

Video: कोरिओग्राफर टेरेंसने केला नोराला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न

त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर नोरा फतेही सध्या रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डांसर या शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शोमधील परिक्षक मलायका अरोराला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे शोमध्ये नोराची एण्ट्री झाली. सध्या नोरा शोमध्ये मजा मस्ती करताना दिसत आहे. नुकताच नोराला शोमधील परिक्षक कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने इंप्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे.

इंडियाज बेस्ट डांसर शोमधील नोराचे डान्स व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक वेगळा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये टेरेंस नोराला तिच्या भाषेमध्ये प्रपोज करताना दिसत आहे. टेरेंस नोराच्या आईला एक मेसेज देत आहे. ‘काकी तुमची मुलगी खूप सुंदर आहे. तिचे डोळे देखील खूप सुंदर आहेत’ असे टेरेंस बोलतो.

नोरा ते ऐकून आनंदी होते. त्यानंतर भारती सिंग त्याचे उत्तर पंजाबी भाषेत द्यायला सांगते. त्यानंतर नोरा आणि टेरेंस ‘दिलबर’ गाण्याच्या अरेबिक व्हर्जनवर डान्स करतात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत असून चाहते कमेंट करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 7:32 pm

Web Title: terence and nora video viral on internet avb 95
Next Stories
1 ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ प्रदर्शित; विजय मल्ल्या ते मेहुल चोक्सीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी नेटफ्लिक्सवर
2 करोनाविषयक प्रबोधनात्मक लघुपट ‘संक्रमण’
3 ‘म्हणून आता द्राक्ष आंबट लागतायत’, गजेंद्र चौहान यांचा मुकेश खन्नावर निशाणा
Just Now!
X