19 October 2019

News Flash

Video : ‘आया रे सबका बाप रे’, ‘ठाकरे’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित

संजय राऊत प्रस्तुत व लिखित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

२०१९ या वर्षातला बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असलेला ठाकरे हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावात व्यक्तिमत्वाचा बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्यातच आता या चित्रपटातील गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत ‘आया रे सबका बाप रे,कहते है उसको ठाकरे हे हिंदी गाणं प्रदर्शित झालं. या म्युझिक लॉन्च सोहळ्यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीमही उपस्थित होती. विशेष म्हणजे अवघ्या काही काळापूर्वी प्रदर्शित झालेलं हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरत असून त्याच्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतांना दिसत आहे.

या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका वठविली असून अभिनेत्री अमृता रावने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. संजय राऊत प्रस्तुत व लिखित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे.

First Published on January 12, 2019 3:04 pm

Web Title: thackeray movie music launch event in mumbai