11 July 2020

News Flash

प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

प्राजक्ताविरोधात मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप

प्राजक्ता माळी

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. वारंवार नोटीस बजावूनदेखील कोर्टात हजर न राहिल्याने एक हजार रुपयांचा दंड आकारत ठाणे कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. फॅशन डिझाइनर जान्हवी मनचंदाने ठाणे कोर्टात प्राजक्ताविरोधात याचिका दाखल केली. मारहाण केल्याचा आरोप जान्हवीने प्राजक्तावर केला होता. तर दंडाधिकारी कोर्टातील खटल्याविरोधात प्राजक्ताने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्राजक्ताविरुद्ध मनचंदा हिने ५ एप्रिल रोजी ठाणे ग्रामीणच्या काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मारहाण करत शिवीगाळ केल्याचा प्राजक्तावर आरोप आहे.

काय आहे प्रकरण?
फॅशन शोदरम्यान दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने केला आहे. या प्रकरणाशी संबंधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही व्हायरल झाला होता. मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं प्राजक्ताने स्पष्ट केलं होतं.

‘जान्हवीने व्हायरल केलेले फोटो आणि व्हॉट्स अॅप चॅटचे स्क्रिनशॉट खोटे आहेत. ती माझी फॅशन डिझायनर होती आणि कपड्यांवरून माझं तिच्याशी मतभेद झाले होते. पण तिला मी मारहाण केली नाही. तिच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. असं काही घडलं असतं तर सेटवरील लोकांनासुद्धा कळलं असतं,’ असं ती म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 4:20 pm

Web Title: thane court issued bailable warrant and fined marathi actress prajakta mali ssv 92
Next Stories
1 Video viral : रणवीरची मिशी दीपिकाने कापली
2 ‘कमाल’च झाली! कारचा अपघात झाल्यानंतरही अभिनेत्याचा मुलगा मागतोय नवीन गाडी
3 इतिहासातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा तिकीटबारीवर ‘फत्तेशिकस्त’
Just Now!
X