News Flash

Video : प्रत्येकाने पाहावा असा तापसीच्या चित्रपटाचा ट्रेलर

'फक्त कानाखालीच मारली ना' असं म्हणत अगदी सहजतेने या विषयाकडे बघणाऱ्यांना चपराक लगावणारा या चित्रपटाचा विषय आहे.

एखादा कलाकार कोणता चित्रपट करतो यापेक्षा कोणत्या विषयाचे चित्रपट करतो या गोष्टीला फार महत्त्व असतं. हेच महत्त्व लक्षात घेत अभिनेत्री तापसी पन्नू एकापेक्षा एक दमदार असे विषय प्रेक्षकांच्या समोर मांडतेय. आगामी ‘थप्पड’ या चित्रपटाच्या माध्यमातून तापसी पुन्हा एकदा महिलांचा विषय समोर आणणार आहे पण एका वेगळ्या पद्धतीने.. विषय तसा पाहिला तर साधाच आहे.. पतीने पत्नीवर उगारलेला हात. मात्र या विषयाची गंभीरता आपल्याला चित्रपटाचा ट्रेलर पाहून कळते.

जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमधून साध्यासोप्या वाटणाऱ्या मुद्द्याची गंभीरता सहज लक्षात येते. पतीने पत्नीला फक्त कानाखाली मारल्याचीच चित्रपटाची गोष्ट आहे पण… हा ट्रेलर ‘फक्त कानाखालीच मारली ना’ असं म्हणत अगदी सहजतेने या विषयाकडे बघणाऱ्यांना चपराक लगावणारा आहे. ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘थप्पड’चे दिग्दर्शन केले आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्यामध्ये ‘थप्पड’चा विषय काय वळण घेऊन येतो हे याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यातील संवादसुद्धा मनाला भिडतात.

सोशल मीडियावर या ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. तापसीचं दमदार अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘सांड की आँख’ या तिच्या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. मात्र ‘थप्पड’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तापसी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास समिक्षकांकडून व्यक्त होत आहे. येत्या २८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 5:51 pm

Web Title: thappad trailer taapsee pannu anubhav sinha ssv 92
Next Stories
1 करीनामुळे तैमुर बिघडतोय- सैफ अली खान
2 मोनालिसाच्या चित्रचोरीवर येणारा सिनेमा ही अभिनेत्री करणार दिग्दर्शित
3 Video : फक्त तीन तासांत मिळालं स्टारडम- अशोक सराफ
Just Now!
X