News Flash

..म्हणूनच मल्लिकाचा चाहता तिला ठार मारणार होता

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ या चित्रपटानंतर मल्लिका हे नाव बॉलिवूडमध्ये चांगलंच प्रसिद्ध झालं.

मल्लिका शेरावत

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन आणि मल्लिका शेरावत हे समीकरण कायमच जोडलं गेलं आहे. अनेक वेळा मल्लिका तिच्या बोल्ड अंदाजासाठी चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये बोल्ड दृश्य देणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये मल्लिकाचं नाव कायमच अग्रस्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ या चित्रपटानंतर मल्लिका हे नाव बॉलिवूडमध्ये चांगलंच प्रसिद्ध झालं. मात्र तिच्या याच अंदाजामुळे तिला अनेकवेळा ट्रोल व्हावं लागलं इतकंच नाही तर तिच्या चारित्र्यावरही काहींनी संशय घेतला. या साऱ्यांवरुन मल्लिकाने नुकताच एक अनुभव शेअर केला आहे.

चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका करणारी मल्लिका तिच्या प्रत्यक्ष जीवनातही तेवढीच बोल्ड आणि बिंधास्त आयुष्य जगताना दिसून येते. मात्र तिचं हेच बिंधास्त जगणं कधीकाळी तिच्या जीवावर बेतलं होतं. प्रत्येक कलाकाराचे लाखोंच्या संख्येने चाहते असतात. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या कलाकाराविषयी प्रत्येक चाहत्याच्या मनात एक हळवा कोपरा असतो. त्यामुळे अनेक वेळा या कलाकारांना चित्रीकरणावेळी काही दुखापत झाली तर चाहत्यांना त्या जखमेची झळ पोहोचते. तर काही वेळा कलाकारांकडून आक्षेपार्ह वर्तन घडलं तर चाहते त्यांचा राग व्यक्त करतात.

मल्लिकाच्या अशाच एका कृत्याचा तिच्या चाहत्याला प्रचंड राग आला होता आणि रागाच्या भरात तो मल्लिकाला जीवे मारणार होता. मल्लिकाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा अनुभव कथन केला आहे. माझे हजारो चाहते आहेत.प्रत्येक चाहत्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. मात्र पहिल्यांदाच माझा सामना एका माथेफिरू चाहत्याबरोबर झाला, असं ती म्हणाली.

‘या चाहत्याला माझ्या पेहरावावर आक्षेप होतो. त्यामुळे तो दिवस-रात्र माझा पाठलाग करत असे. विशेष म्हणजे त्याने समाजात महिलांबरोबर जे काही कुकर्म घडतात ते माझ्यामुळेच होत असल्याचं सांगितलं होतं. माझा पेहराव अनेक वेळा पाश्चात्य पद्धतीचा असतो आणि माझं अनुकरण आजच्या तरुणी करतात. त्यामुळेच या मुलींवर अत्याचार, बलात्कार यासारख्या घटना घडतात’ असं या चाहत्याने एका पत्रात नमूद करुन ते माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं.

पुढे त्याने असंही म्हटलं, ‘मी हरियाणाची आहे त्यामुळे पडद्यावरील माझ्या बोल्ड दृश्यांमुळे हरियाणाचं नाव खराब होत आहे. त्यामुळे मी पारंपारिक वेशात म्हणजे साडी आणि डोक्यावर पदर या वेशात वावरावं’ असं त्याचं मत होतं.
दरम्यान, या चाहत्याचं पत्र वाचून काही काळ माझ्या मनात भिती निर्माण झाली होती. जर मी या चाहत्याचं ऐकलं नाही तर हा माझा जीवच घेईल असं काही काळ मला वाटत होत. खरंतर त्याने मला धमकीवजा पत्रच लिहीलं होतं. मात्र या साऱ्या विचारांना दूर सारत मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं.

सध्या मल्लिका एका संस्थेबरोबर काम करत आहे. ही संस्था अनाथ आणि देहविक्रिय व्यापारात जबरदस्ती ढकलेल्या मुलींसाठी काम करते. या संस्थेच्या माध्यमातून या मुलींच आयुष्य सावरण्याचा प्रयत्न सुरु असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 1:38 pm

Web Title: that fan wanted to kill me mallika sherwat
Next Stories
1 ‘शमशेरा’मध्ये रणबीरसोबत संजय दत्तही दिसणार?
2 सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू
3 ..म्हणून ‘संजू’चं यश साजरा करण्यासाठी संजय दत्त आलाच नाही
Just Now!
X