News Flash

..म्हणून सलमान राहतो वन बीएचके प्लॅटमध्ये

एका चॅट शोमध्ये सलमानने हा खुलासा केला आहे

सलमान खान

सध्याचा सर्वात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता म्हणून सलमान खान ओळखला जातो. सलमान सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये विराजमान आहे. कोट्याधीश असलेला सलमान बंगल्यात राहण्याऐवजी वांद्रे येथील छोट्या प्लॅटमध्ये का राहतो? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडतो. आता चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर खुद्द सलमान खानने दिले आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानने एका चॅट शोला हजेरी लावली होती. दरम्यान त्याला बंगल्यात राहण्याऐवजी अपार्टमेंटमध्ये राहणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ‘मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायला आवडे. मी त्यांना सोडून कोणत्याही बंगल्यात राहायला जाणार नाही. एखाद्या आलिशान बंगल्यापेक्षा मला माझा प्लॅट प्रिय आहे कारण येथे माझे आई-बाबा राहतात. माझे संपूर्ण बालपण या प्लॅटमध्ये गेले आहे’ असे सलमान म्हणाला.

‘मी लहानपणी बराच वेळ अपार्टमेंटच्या खालच्या गार्डनमध्ये खेळायचो आणि कधीकधी तेथेच झोपून जायचो. भूक लागली की कोणाच्याही घरी जायचो. इथली सगळी घर मला माझ्या घरासारखी वाटायची. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. हा फ्लॅट सोडून मी कुठेच जाणार नाही’ असे सलमान पुढे म्हणाला आहे.

आणखी वाचा : एमएमएस लिक झाल्याने नैराश्यामध्ये गेली होती ही अभिनेत्री

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानचे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर घर आहे. या घरात सलमानचे वडिल सलीम खान आणि सलमा खान राहतात. हे घर छोटे असले तरी सलमानच्या कित्येक आठवणी या घराशी जोडलेल्या आहेत. सलमानचा पनवेल येथे मोठा फार्म हाऊल देखील आहे. मात्र सलमान सेलिब्रेशनसाठी तेथे जाताना दिसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:43 pm

Web Title: thats why salman khan is living in 1 bhk flat at bandra avb 95
Next Stories
1 Photo : ऋषी कपूर यांनी दिला ‘या’ आगळ्यावेगळ्या शस्त्राच्या पूजेचा सल्ला
2 विकी कौशललाही भावले सोनालीच्या ‘हिरकणी’चे गाणे
3 एमएमएस लिक झाल्याने नैराश्यात गेली होती ही अभिनेत्री
Just Now!
X