अभिनेत्री आलिया भट सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरतेय. आजच तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातला तिचा लूक प्रेक्षकांच्या आणि नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. पण या नवीन चित्रपटापेक्षाही एका जुन्या प्रसंगाचीच अधिक चर्चा होताना दिसतेय. अभिनेत्री आलिया भट सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरतेय. आजच तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातला तिचा लूक प्रेक्षकांच्या आणि नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. पण या नवीन चित्रपटापेक्षाही एका जुन्या प्रसंगाचीच अधिक चर्चा होताना दिसतेय. रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. हे दोघे जिथेही जातात, तिथे त्यांची हवा असते. पण तुम्हाला हे माहित आहे का की आलिया भट १२ वर्षांची असताना संजय लीला भन्साळीने तिला रणबीरसोबत फ्लर्ट करताना पाहिलं होतं. रणबीर आणि आलियाला घेऊन संजयला ‘बालिका वधू’ हा चित्रपट करायचा होता. त्यावेळचा हा किस्सा आहे.
View this post on Instagram
आलियाच्या ‘हायवे’ या चित्रपटाच्या वेळी बोलताना तिने हा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली की रणबीर आणि तिची पहिली भेट ती १२ वर्षांची असताना झाली. त्यावेळी रणबीर २० वर्षांचा होता आणि संजय लीला भन्साळीला तो असिस्ट करत होता. त्यावेळी आलिया फोटोशूटसाठी आणि लूक टेस्टसाठी आली होती. त्यासाठी तिला रणबीरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसायचं होतं. यासाठी १२ वर्षांची आलिया खरंतर लाजत होती पण संजयला वाटलं की ती रणबीरसोबत फ्लर्ट करत आहे.
आलिया म्हणते की त्याचवेळी संजय लीला भन्साळी यांनी रणबीर आणि आलिया यांच्यातली केमिस्ट्री कळली होती. पुढे एका मुलाखतीत रणबीरनेही या घटनेला दुजोरा दिला आणि आम्ही दोघे एकमेकांशी तेव्हापासूनच कनेक्ट असल्याचं सांगितलं. आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट ३० जुलैला प्रदर्शित होणार आहे. आजच या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. रणबीर आणि आलिया हेही लवकरच प्रेक्षकांना ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण प्रेक्षकांना मात्र वेध लागलेत या दोघांच्या लग्नाचे….बघूयात आता ही बातमीही कधी ऐकायला मिळतेय?
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 5:48 pm