06 March 2021

News Flash

…म्हणून शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर एका रात्री उतरवण्यात आले

'अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस' या चित्रपटातील एका सीनसाठी त्यांनी बिकिनी परिधान केली होती

आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. सत्तर ते ऐंशीच्या दशकात शर्मिला यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यातील ‘कश्मीर की कली’ हा चित्रपट विशेष गाजला आणि शर्मिला यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्याचवेळी शर्मिला आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांनी लग्नदेखील केलं पण या सेलिब्रिटी, शाही जोडीच्या आयुष्यातील एक किस्सा फार कमी लोकांना माहितीये.

त्यावेळी शर्मिला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचा ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ हा चित्रपट विशेष चर्चेत होता. या चित्रपटात शर्मिला यांनी बिकिनी घालून एक सीन दिला होता. मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यावर त्यांचे बिकिनीमधील पोस्टर आणि होल्डिंग लावण्यात आले होते.

बिकिनीमधील शर्मिला यांचा तो फोटो चर्चेत असतानाच एक दिवस अचानक मन्सूर यांची आई त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार होत्या. आता खरी अडचण होती. कारण मन्सूर यांच्या आईला भेटण्यापेक्षा त्यांची आई आपल्याला बिकिनीमध्ये पाहिल याचीच भीती शर्मिला यांना वाटू लागली होती. त्या एका फोटोमुळे मन्सूर यांच्यासोबतचे नाते तुटणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न शर्मिला यांच्या मनात येत होते. मन्सूर यांची त्या पोस्टर्सवर काहीच हरकत नव्हती कारण तो शर्मिला यांच्या कामाचाच एक भाग होता.

आणखी वाचा : आशियातील सर्वात सेक्सी पुरुष कोण? या बॉलिवूड अभिनेत्याने पटकावला मान

शर्मिला यांनी चित्रपट निर्मात्यांना फोन करुन रात्रीतून मुंबईत ज्या ज्या ठिकाणी बिकिनीधील पोस्टर लावण्यात आले होते ते काढून टाकण्यास सांगितले. शाही कुटुंबाचा असणारा रुबाब आणि मोठ्यांच्या समजुती लक्षात घेतच त्यांनी हे पोस्टर हटवण्यास सांगितले होते. शर्मिला यांनी मन्सूर यांच्या आईची भेट घेतली. त्यानंतर शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांचे लग्न झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:09 pm

Web Title: thats why sharmila tagore bikini poster remove from bombay avb 95
Next Stories
1 ३५ वर्षानंतर रजनीकांत-कमल हासन येणार एकत्र
2 Video : सलमान-शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स केला म्हणून अभिनेत्याला पोलिसांनी पकडले
3 मानधनात उर्वशीने सलमानला टाकले मागे, तासाभरासाठी घेतलेली रक्कम वाचून व्हाल अवाक
Just Now!
X